अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशित केरळ येथील एका विद्यार्थिनीला सौजन्याची वागणूक न देता सहकारी काही विद्यार्थ्यांकडून तिचा छळ होत असल्याची तक्रार विद्यार्थिनीच्या पालकांनी अधिष्ठातांकडे केली आहे. या प्रकारणाची चौकशी सुरू असून, असा प्रकार होणार नाही, यासाठी महाविद्यालय प्रशासनाची भूमिका असल्याचे अधिष्ठाता यांनी सांगितले.प्राप्त माहितीनुसार, गत सहा महिन्यांपूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंगचा प्रकार घडला होता. या प्रकरणी तीन विद्यार्थिनींवर कारवाई करण्यात आली होती; परंतु उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर त्या विद्यार्थिनींना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पुन्हा प्रवेशित करण्यात आले. काही दिवस सर्व सुरळीत चालले; मात्र अचानक त्यातील एका विद्यार्थिनीच्या पालकांनी अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे यांची भेट घेत मुलीचा सहकाऱ्यांकडून छळ होत असल्याची तक्रार केली. या तक्रारीमुळे हा प्रकार समोर आल्याने महाविद्यालय परिसरात एकच खळबळ उडाली. त्या विद्यार्थिनीस सहकाºयांकडून सौजन्याची वागणूक मिळत नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी महाविद्यालय प्रशासनातर्फे चौकशी सुरू असल्याचे अधिष्ठातांनी सांगितले.विद्यापीठात तक्रारमहाविद्यालयात काही सहकारी विद्यार्थ्यांकडून होणाºया छळ प्रकरणी या विद्यार्थिनींनी विद्यापीठात तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विद्यार्थिनींच्या या तक्रारीवरून विद्यापीठाने येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाला चौकशीचा आदेश दिला आहे.विद्यार्थिनीच्या पालकांनी केलेल्या तक्रारीची दखल घेण्यात आली असून, चौकशी सुरू आहे. सहकाºयांकडून विद्यार्थिनींचा छळ होणार नाही, यासाठी आवश्यक पाऊल उचलण्यात येत आहे.- डॉ. शिवहरी घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला