- प्रवीण खेतेअकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील सोनोग्राफी वार्ड क्र. १७ च्या एका खोलीचा पीओपी स्लॅब कोसळल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली. या छताला मागील काही दिवसांपासून सततची गळती लागली असून, हा प्रकार असाच सुरू राहिल्यास मोठी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.सर्वोपचार रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत वार्ड क्र. १७ मध्ये सोनोग्राफीसोबतच सीटी स्कॅन कक्ष आहे. याच कक्षाच्यावर गायनिक विभागातील स्वच्छता गृह असून, येथील पाण्याची गळती थेट सोनोग्राफी कक्षाच्या छतातून होत आहे. पावसामुळे या गळतीचे प्रमाण वाढल्याने सोनोग्राफी कक्षाच्या भिंतींचे पोपडे पडू लागले आहेत. अशातच शनिवारी वार्डातील एका खोलीच्या छताचे पीओपी स्लॅब कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने ही खोली बंद असल्याने यामध्ये कुठलाच रुग्ण किंवा कर्मचाºयाला इजा झाली नाही; मात्र खोलीत नवीन एक्स-रे मशीन असल्याची माहिती आहे. या मशीनचा अद्याप उपयोगही करण्यात आला नाही, हे विशेष. याच घटनेची पुनरावृत्ती वार्डातील इतर खोल्यांमध्येही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जुनी झालेली इमारत, सततची गळती आणि शनिवारी पीओपी स्लॅब कोसळल्याची घटना यामुळे डॉक्टरांसह येथे काम करणाºया कर्मचारी आणि रुग्णांमध्ये मात्र धास्ती भरली आहे.गत अनेक महिन्यांपासून गळतीमागील अनेक महिन्यांपासून सोनोग्राफी वार्डाच्या छताला गळती असल्याची माहिती येथील कर्मचाऱ्यांनी दिली. गळतीचे पाणी हे वरच्या मजल्यावर गायनिक विभागाच्या स्वच्छतागृहातील असल्याने वार्डात दुर्गंधीही पसरली आहे. या दुर्गंधीमुळे रुग्णांसोबतच येथे निरंतर कार्य करणाºया परिसेविका आणि डॉक्टरांचेही आरोग्य धोक्यात आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाची डोळेझाकइमारतीची दुरवस्था आणि छताला लागलेली गळती यासंदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय प्रशासनातर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाला सुचित करण्यात आले आहे. गत वर्षभरापासून पत्रव्यवहार सुरू असूनही सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे कुठलाच प्रतिसाद नाही.९२ वर्षे जुनी इमारतसर्वोपचार रुग्णालयाची जुनी इमारत १९२ ७ मध्ये बांधण्यात आली होती. या इमारतीला जवळपास ९२ वर्षे पूर्ण झाली असून, ती धोकादायक ठरत आहे. अशा स्थितीतही या इमारतीमध्ये महत्त्वाचे विभाग कार्यरत असून, शेकडो रुग्णांचा जीव धोक्यात आहे.