लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: महावितरणमध्ये कार्यरत असलेले राज्यभरातील ५00 सुरक्षा रक्षक मुंडन करून मंगळवार, १२ डिसेंबर नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढणार आहेत. या अनुषंगाने प्रदेश काँग्रेस असंघटित कामगार सेलच्या अंतर्गत अकोला जिल्हय़ातील महावितरणच्या सुरक्षा रक्षकांनी सोमवारी दुपारी येथील स्वराज भवनात सामूहिक मुंडन करून राज्य सरकारचा निषेध नोंदविला. नागपूर हिवाळी अधिवेशनावर सुरक्षा रक्षक कपातीचे परिपत्रक रद्द होण्यासाठी मंगळवारी मोर्चा काढण्यात येत असून, त्या मोर्चामध्ये राज्यभरातून सुमारे ५00 सुरक्षा रक्षक मुंडन करून सरकारचा व महावितरणच्या निर्णयाचा निषेध करणार आहेत. या असंघटित कामगार सेल मोर्चाचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष मो. बदरुज्जमा हे करणार असून,आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांना देतील. हे सुरक्षा रक्षक नागपूर येथील आक्रोश मोर्चामध्ये सहभागी होणार असून, या मोर्चाला इंटक अकोला झोनचे अध्यक्ष बी. के. मनवर यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे. सोमवारी स्वराज भवन येथे काँग्रेसचे शहराध्यक्ष बबनराव चौधरी, माजी महापौर मदन भरगड, मनपा विरोधी पक्षनेते साजीद खान पठाण, काँग्रेस नेते प्रकाश तायडे, अविनाश देशमुख, राजेश भारती, कपील रावदेव, अनंत बगाडे यांच्या उपस्थितीत आयोजित निषेध आंदोलनात सचिन ढोणे, प्रकाश महल्ले, अरविंद खंडारे, बाबूराव पवार, राजेश वावघे, श्रीराम इंगळे, नागो ताले, संजय काकडे, रामभाऊ बंड, विनोद जायभाये, अमोल नगरे, पुरुषोत्तम बायस्कार, अक्षय बागडे, गजेंद्र कळमकार, मंगेश काटोले, अनिल साबळे, रामकृष्ण नाठे, मो. इद्रिस, गजानन बोचे, जितेंद्र घन, गोपाल नेमाडे आदी सुरक्षा रक्षकांनी सहभाग नोंदविला. यावेळी सुरक्षा रक्षकांनी सरकारविरोधी घोषणाबाजी केली. आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या मोर्चाकरिता संघटनेचे जिल्हा संघटक अशोक अबगड, राहुल वाघ, अकोट तालुका संघटक गजेन्द्र कळमकर, तेल्हारा संघटक बोदळे, बाश्रीटाकळीचे संघटक आरिफ शहा यांच्यासह देविदास घुगे, प्रकाश ढोके, भुषण खवले, मंदा इंगळे, ललीता राठोड, सुनंदा पुरी, कैलास इंगोले, संजय श्रृंगारे, अत्रीनंदन इंगळे, अलीम शहा, विक्रम रायचंद, उमेश तरले, भरत इंगळे आदींसह बहुसंख्य सुरक्षा रक्षक या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत असे जिल्हा संघटक अशोक अबगड यांनी कळविले आहे.
अकोला : महावितरणच्या सुरक्षा रक्षकांनी मुंडन करून नोंदविला शासनाचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 8:22 PM
अकोला: महावितरणमध्ये कार्यरत असलेले राज्यभरातील ५00 सुरक्षा रक्षक मुंडन करून मंगळवार, १२ डिसेंबर नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढणार आहेत. या अनुषंगाने प्रदेश काँग्रेस असंघटित कामगार सेलच्या अंतर्गत अकोला जिल्हय़ातील महावितरणच्या सुरक्षा रक्षकांनी सोमवारी दुपारी येथील स्वराज भवनात सामूहिक मुंडन करून राज्य सरकारचा निषेध नोंदविला.
ठळक मुद्देअधिवेशनावर जनआक्रोश मोर्चासाठी रवाना प्रदेश काँग्रेस असंघटित कामगार सेल