अकोला : स्थानिक निमवाडी स्थित वस्तू व सेवाकर कार्यालय ‘आयएसओ’ मानांकनाच्या वाटेवर असून, त्या दिशेने या कार्यालयाची घोडदौड सुरू आहे. आयएसओ प्रमाण देणाऱ्या तपासणीच्या पथकाने अकोला कार्यालयास नुकतीच दुसरी भेट देऊन काही सुधारणा करण्याच्या सूचना केल्या आहेत. सुचविलेल्या सुधारणा होताच अकोला जीएसटी कार्यालय आयएसओने सन्मानित होण्याचे संकेत आहेत.वस्तू आणि सेवाकर कायद्याची अंमलबजावणी जुलै २०१७ मध्ये झाली. देशभरातील विक्रीकर कार्यालयाचे नाव एका दिवसात बदलले गेले. अकोल्यातील निमवाडी कार्यालयाचे नावही तातडीने बदलले गेले. दरम्यान, काही दिवसांतच जीएसटी कर उपायुक्त म्हणून डॉ. अनिल करडेकर रुजू झालेत. कार्यालयाचा प्रभार घेताच त्यांनी येथे स्वच्छता मोहीम राबविली. परिसरातील घाण, कार्यालयातील सहकाºयांच्या सहकार्याने साफ करण्यात आली. त्यानंतर स्टोअर रूम गेल्या २२ वर्षांपासून स्वच्छ झाली नव्हती. २२ वर्षांची कार्यालयीन रद्दी पडून होती. जुने वॉटर कुलर तसेच भंगार पडून होते. या सर्व साहित्यांची विक्री करण्यासाठी रीतसर निविदा मागवून त्याची विक्री करण्यात आली. कार्यालयातील अधिकाºयांचे आणि सार्वजनिक स्वच्छतागृह स्वच्छ करून घेण्यात आले. मागील झुडुपे काढली गेलीत. पक्षांच्या पाणवठ्यापासून लहान-सहान व्यवस्थेत सुधारणा करण्यात आली. रंगरंगोटीचा प्रस्ताव अजूनही रेंगाळत असला, तरी कार्यालयाचे आधीचे चित्र आणि आताचे चित्र बदलले आहे. कार्यालयाच्या या बदलाचा मागोवा घेतला असता, ही सर्व तयारी आयएसओ मानांकनाची असल्याचे समोर आले.-सोलापूरचे जीएसटी कार्यालय आयएसओ मानांकित झाल्याची बाब मला ठाऊक होती. त्यामुळे अकोला कार्यालयाला आयएसओ मानांकन का मिळू नये, असे वाटले अन् त्या दिशेने प्रवास सुरू झाला. सोलापूरच्या कार्यालयाची पाहणी आणि माहिती काढून प्रयोग केले. या प्रयोगात कार्यालयाची स्वच्छता, आॅनलाइन कार्यपद्धती, सीसी कॅमेरे, बायोमेट्रिक हजेरी, पाणी व्यवस्था, पार्किंग, विविध विभागांच्या फलक ांचा समावेश आहे. दोनदा हे पथक अकोला कार्यालयात येऊन गेले असून, त्यांचे निकष पूर्ण झाल्यानंतर अकोला जीएसटी कार्यालयास हा सन्मान मिळू शकेल.-डॉ. अनिल करडेकर, राज्यकर उपायुक्त, जीएसटी कार्यालय, अकोला.