अमरावती : अचलपूर मतदारसंघाचे आमदार तथा अकोल्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे शनिवारी प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी अहवालावरून स्पष्ट झाले आहे. त्यांच्या पत्नी नयना कडू आणि कुटुंबातील इतर १२ जणांना लागण झाली आहे. स्थानिक डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती रुग्णालयात त्यांनी कुटुंबीयांसह चाचणी करून घेतली. बच्चू कडू हे अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. डॉक्टरांच्या सन्मानार्थ तेथील कोविड रुग्णालयात आपण उपचार घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानुसार रविवारी सकाळी ते अकोला येथे उपचारार्थ दाखल होतील. कुटुंबातील इतर १२ जण अमरावतीच्या बख्तार रुग्णालयात इलाज घेणार असल्याची माहितीे ना. कडू यांनी ‘लोकमत’ला दिली.
धनादेश वितरण कार्यक्रमाला उपस्थितीना. कडू शनिवारी दिवसभर अमरावती जिल्हा दौºयावर होते. दुपारी शासकीय विश्रामगृहात त्यांच्या हस्ते महावितरण कर्मचाºयांना ५० लाखांचे धनादेश वाटण्यात आले. यावेळी ५० पेक्षा अधिक व्यक्ती कार्यक्रमाला उपस्थित असल्याने एकच गहजब झाला आहे. या लोकप्रतिनिधींनाही झाला होता कोरोनाखासदार नवनीत राणा, बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवि राणा, वरूड-मोर्शी मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार, शिक्षक मतदारसंघाचे आमदार श्रीकांत देशपांडे, दर्यापूर मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे, माजी मंत्री जगदीश गुप्ता यांनादेखील यापूर्वी कोरोना संक्रमण झाले आहे.