अकोला : ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यात उन्हाचा पारा सुरुवातीपासून कमी-जास्त होत आहे. दरवर्षीपेक्षा यंदा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तापमान कमी आहे. मंगळवारी जिल्ह्याचे तापमान ४१.६ अंश सेल्सिअस नोंदविल्या गेले. तापमानात ढगाळ वातावरणाचा परिणाम दिसून येत आहे. तरी हे विदर्भात सर्वाधिक तापमान होते. यावर्षी मार्च महिन्यापासून चटके जाणवायला सुरुवात झाली. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उष्णतेची लाट होती. यामुळे यंदा पारा उच्चांक गाठणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला; मात्र प्रत्येक दोन-तीन आठवड्यातून ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाने हजेरी लावली. या वातावरणामुळे तापमानात घट झाली. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उन्हाचा पुन्हा तडाखा बसू लागला आहे. रविवारी जिल्ह्यात उच्चांक ४३.० अंश सेल्सिअस तापमान नोंदविल्या गेले. हे यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमान आहे; परंतु पुन्हा जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे तापमानात घसरण झाली आहे. जिल्ह्यात मंगळवारी ४१.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तापमान कमी झाले असले तरी हे विदर्भातील सर्वाधिक तापमान होय. या वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. आधीच कोरोनाचा कहर, त्यामध्ये वाढते तापमान डोकेदुखी बनले आहे.
--बॉक्स--
विदर्भात या जिल्ह्यांचा पारा सर्वाधिक
अकोला ४१.६
यवतमाळ ४०.७
चंद्रपूर ४०.२
वर्धा ४०.०
अमरावती ४०.०