नीलिमा शिंगणे-जगडअकोला : हॅण्डबॉल आणि रग्बी खेळासारखा खेळल्या जाणारा डयुबॉल खेळाची प्रथमच अकोला येथे राष्ट्रीय पातळीची स्पर्धा आयोजित केली आहे. संगीतकार वसंत देसाई क्रीडांगण येथे रविवारी चौथ्या राष्ट्रीय (१९ वर्षाआ तील मुले-मुली) डयुबॉल स्पर्धेचे उद्घाटन झाले. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र संघाचा सामना आसाम संघासोबत झाला. महाराष्ट्र संघातील खेळाडूंनी अतिशय सुंदर खेळप्रदर्शन करीत ७-१ असा विजय मिळविला. मुलींच्या गटातील सामन्यात महाराष्ट्राला कर्नाटककडून 0-१ ने पराभव स्वीकारावा लागला.मुलांच्या गटात दिल्ली, कर्नाटक, बिहार, आंध्र प्रदेश आणि गोवा संघाने आ पल्या प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळविला. सकाळच्या सत्रात मुलींच्या गटा तील पहिला सामना दिल्ली व राजस्थान संघात झाला. दिल्लीच्या समीक्षाने दोन गोल नोंदवित संघाला विजय मिळवून दिला. दुसरा सामना कर्नाटक व महाराष्ट्र संघात झाला. कर्नाटकच्या श्रुतीने एक गोल करू न संघाला आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या अंतिम क्षणापर्यंत आघाडी कायम ठेवण्यात कर्नाटक संघाला यश मिळाले. महाराष्ट्राला या सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले.मुलांच्या गटात पहिला सामना बिहार व मध्य प्रदेश संघात झाला. बिहारने एकतर्फी ४-१ असा विजय मिळविला. बिहारच्या मोनू निगम, पवन कुमार यांनी प्रत्येकी दोन, तसेच मध्य प्रदेशच्या शिव राणा याने एक गोल केला. दुसरा सामना आंध्र प्रदेश आणि तेलंगणा संघात होऊन आंध्र प्रदेशने ३-१ ने सामना जिंकला. आंध्र प्रदेशचा जी. किरण याने दोन, जुनेद व तिवारी यांनी प्रत्येकी एक गोल केला. तिसरा सामना गत राष्ट्रीय विजेता संघ गोवा व राजस्थान संघात झाला. गोव्याचा इब्राहिम शेख याने तीन आणि उल्पात शेट याने दोन गोल करू न सामन्यावर सहज विजय मिळविला. चौथा सामना महाराष्ट्र आणि आसाम संघात खेळला गेला. महाराष्ट्र संघाने उत्कृष्ट खेळप्रदर्शन केले. रोशन चंदनखेडे चार, प्रज्वल मुळे दोन आणि यश काटे याने एक गोल करू न आसामचा धुव्वा उडविला. आसामच्या प्रसन्नाला एक गोल करण्यास यश मिळाले. स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी खेळल्या गेलेल्या प्रदर्शनी सामन्यात महाराष्ट्र संघाला गोवा संघाने १-३ अशा गुणांनी पराभूत केले.