अकोला : केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात शेतकरी जागर मंचाने येथील पोलिस मुख्यालयात सुरु केलेल्या आंदोलनास बुधवारी तिसºया दिवशी व्यापक स्वरुपात पाठिंबा मिळत आहे. बुधवारी दुपारी अनेक गावांच्या शेतकºयांनी आंदोलन स्थळाला भेटी देण्यास सकाळपासूनच सुरुवात केली. शेकापचे प्रदिप देशमुख, अ. भा. छावाचे रणजीत काळे, छावा संघटनेचे शंकर वाकोडे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह आंदोलनस्थळी दाखल होऊन आंदोलनास पाठिंबा व्यक्त केला. भोकरदनचे जिल्हा परिषद सदस्य केशव पाटील जवंजाळ, मुंबईचे उद्योजक एकनाथ दुधे यांच्यासह विविध क्षेत्रातील मंडळी आंदोलनात सहभागी होत आहेत. पोलिस मुख्यालय परिसरास आंदोलनभूमीचे स्वरुप आले असून, आत व बाहेर शेकडो शेतकरी दिसत आहेत.विठ्ठल वाघांनी केली कविता सादरसुप्रसिद्ध वºहाडी कवी विठ्ठल वाघ यांनी बुधवारी सकाळीच पोलिस मुख्यालय गाठून आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला. या ठिकाणी उपस्थित असलेल्या शेतकºयांसमोर त्यांनी खास त्यांच्या शैलीत शेतकºयांच्या जीवनावर आधारित वºहाडी कविता सादर केली.माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी येणारयशवंत सिन्हांच्या आंदोलनास आता राष्ट्रीय स्तरावरूनही पाठिंबा मिळत आहे. तृणमुल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी हे देखील दुपारच्या सुमारास आंदोलनस्थळी भेट देऊन सिन्हा यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे.
अकोला : यशवंत सिन्हांच्या आंदोलनास वाढता पाठिंबा
By atul.jaiswal | Published: December 06, 2017 2:29 PM
अकोला : केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात शेतकरी जागर मंचाने येथील पोलिस मुख्यालयात सुरु केलेल्या आंदोलनास बुधवारी तिसºया दिवशी व्यापक स्वरुपात पाठिंबा मिळत आहे.
ठळक मुद्देराजकीय पक्ष - संघटनांचे पदाधिकारी दाखल परिसरातील शेतकºयांची रिघ वाढली