अकोला : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काँग्रेसचे 'जवाब दो मोदी' आंदोलन

By Atul.jaiswal | Published: April 17, 2023 04:11 PM2023-04-17T16:11:58+5:302023-04-17T16:12:41+5:30

राज्यातील विविध जिल्ह्यात काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनात 'जवाब दो मोदी' आंदोलन राबविले जात आहे.

Akola Javab Do Modi movement of Congress in Collector office area nana patole | अकोला : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काँग्रेसचे 'जवाब दो मोदी' आंदोलन

अकोला : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काँग्रेसचे 'जवाब दो मोदी' आंदोलन

googlenewsNext

केंद्र सरकारच्या विरोधात राज्यातील विविध जिल्ह्यात काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनात 'जवाब दो मोदी' आंदोलन राबविले जात आहे. या अनुषंगाने सोमवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात महानगर काँग्रेसच्या वतीने 'जवाब दो मोदी' आंदोलन करण्यात आले. महानगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे यांच्या पुढाकारात आयोजित या आंदोलनात सहभागी नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर टीका करीत 'मोदी हटाव देश बचाव'च्या घोषणा दिल्या.

या आंदोलनाच्या माध्यमातून जनतेला जागृत करून भ्रष्टाचाराचे नमुने जनतेसमोर आंदोलनाच्या माध्यमातून मांडण्यात येणार असल्याचे महानगर काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. वानखडे यांनी यावेळी सांगितले. यावेळी प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी डॉ. अभय पाटील, प्रशांत गावंडे, विवेक पारस्कर, अनिशा शाह आदींनी मोदी सरकारचा निषेध करित आपले विचार व्यक्त केले.

या आंदोलनात कपिल रावदेव, महेंद्र गवई, माजी नगरसेवक पराग कांबळे, रवी शिंदे, आलम खान, प्रशांत प्रधान, ॲड सुरेश ढाकोलकर, विजय देशमुख,हरीश कटारिया, पंकज देशमुख, आकाश कवडे, सखावत शहा, अतुल अमानकर,मनीष मिश्रा,सोमेश डीगे, शेख हनीफ, अतुल भालतीलक,सचिन तिडके, विशाल इंगळे, ॲछ. अंकुश गावंडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Akola Javab Do Modi movement of Congress in Collector office area nana patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.