- अतुल जयस्वालअकोला : गत तीन ‘टर्म’पासून अकोला लोकसभा मतदारसंघावर राज्य गाजविणारे भारतीय जनता पक्षाचे खासदार संजय धोत्रे यांनी या लोकसभेत स्वत:चा विक्रम मोडीत काढला आहे. गत निवडणूकीत ४ लाख ५६ हजार ४७२ मतांसह विजयी झालेल्या संजय धोत्रे यांनी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळानूसार आतापर्यंत ५ लाख ८ हजार ७९० मते मिळवित नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांची विजयी घोडदौड सुरुच असून, त्यांनी जवळचे प्रतिस्पर्धी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर व काँग्रेसचे हिदायत पटेल यांना बरेच मागे सोडले आहे. प्रकाश आंबेडकर यांना २ लाख ५९ हजार ७८७ मते मिळाली आहेत. तर हिदायत पटेल यांना २ लाख ३१ हजार १७५ मते मिळाली आहेत.भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपाचे संजय धोत्रे, काँग्रेसचे हिदायत पटेल, वंचित बहूजन आघाडीचे अॅॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यात तिरंगी लढत होत आहे. १९८४ पर्यंत काँग्रेसचा गड असलेल्या या मतदारसंघात भाजपाने १९८९ मध्ये विजय मिळविल्यावर काँग्रेसला उतरती कळा लागली. १९९८ व १९९९ या दोन निवडणुकीत काँग्रेसने अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आघाडीकेल्यामुळे त्याना यश मिळाले. मात्र आंबेडकरांनी काँग्रेसची साथ सोडताच काँर्ग्रेसला व अॅॅड.आंबेडकरांनाही विजय मिळाला नाही. २०१४ च्या निवडणुकीत रिंगणात असलेलेच उमेदवार २०१९ मध्ये पुन्हा एकदा समोर आल्याने निकालाची पुनरावृत्ती होते की वंचित किंवा काँग्रेस चमत्कार करते याबद्दल उत्सुकता आहे.अकोला लोकसभा मतदारसंघात एकूण १८ लाख ६१ हजार ७३९ मतदार असून यंदाच्या निवडणुकीत ५९.९८ टक्के टक्के मतदान झालंय.गेल्या निवडणुकीत संजय धोत्रे यांनी ४ लाख ५६ हजार ४७२ मतांसह विजय साकारला होता, तर काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल यांना २ लाख ५३ हजार ३५६ मते मिळाली होती.
अकोला लोकसभा निवडणूक निकाल 2019: संजय धोत्रेंनी मोडला स्वत:चा विक्रम; ५ लाख ३३ हजार मतं, प्रतिस्पर्ध्यांवर मोठी आघाडी
By atul.jaiswal | Updated: May 23, 2019 16:39 IST
Akola Lok Sabha Election Results 2019
अकोला लोकसभा निवडणूक निकाल 2019: संजय धोत्रेंनी मोडला स्वत:चा विक्रम; ५ लाख ३३ हजार मतं, प्रतिस्पर्ध्यांवर मोठी आघाडी
ठळक मुद्दे ५ लाख ८ हजार ७९० मते मिळवित नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. काश आंबेडकर यांना २ लाख ५९ हजार ७८७ मते मिळाली आहेत. हिदायत पटेल यांना २ लाख ३१ हजार १७५ मते मिळाली आहेत.