शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

अकोला लोकसभा निवडणूक निकाल 2019:  पाचव्या फेरीअखेर भाजपच्या संजय धोत्रेंची जोरदार मुसंडी; आंबेडकर, पटेल अडखळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 11:51 IST

Akola Lok Sabha Election Results 2019

अकोला : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून अकोल्यामध्ये पहिल्या फेरीपासूनच भारतीय जनता पक्षाचे संजय धोत्रे यांनी आघाडी घेतली आहे. पाचव्या फेरी अखेर त्यांनी लाखाचा आकडा पार केला असून, त्यांना १०२२८५ मतं मिळाली असून , वंचित बहूजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडर यांच्या पारड्यात ६१४१२ मतं पडली आहेत. काँग्रेसच्या हिदायत पटेल यांना ४५७७० मते मिळाली आहेत.भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपाचे संजय धोत्रे, काँग्रेसचे हिदायत पटेल, वंचित बहूजन आघाडीचे अ‍ॅॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यात तिरंगी लढत होत आहे. १९८४ पर्यंत काँग्रेसचा गड असलेल्या या मतदारसंघात भाजपाने १९८९ मध्ये विजय मिळविल्यावर काँग्रेसला उतरती कळा लागली. १९९८ व १९९९ या दोन निवडणुकीत काँग्रेसने अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आघाडीकेल्यामुळे त्याना यश मिळाले. मात्र आंबेडकरांनी काँग्रेसची साथ सोडताच काँर्ग्रेसला व अ‍ॅॅड.आंबेडकरांनाही विजय मिळाला नाही. २०१४ च्या निवडणुकीत रिंगणात असलेलेच उमेदवार २०१९ मध्ये पुन्हा एकदा समोर आल्याने निकालाची पुनरावृत्ती होते की वंचित किंवा काँग्रेस चमत्कार करते याबद्दल उत्सुकता आहे.लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून अकोल्यामध्ये पहिल्या फेरीनंतर संजय धोत्रे यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना १६८२३ मतं मिळाली असून , प्रकाश आंबेडर यांच्या पारड्यात १०३८९ मतं पडली आहेत. हिदायत पटेल यांना ६७९४ मते मिळाली आहेत.अकोला लोकसभा मतदारसंघात एकूण १८ लाख ६१ हजार ७३९ मतदार असून यंदाच्या निवडणुकीत ५९.९८ टक्के टक्के मतदान झालंय.गेल्या निवडणुकीत संजय धोत्रे यांनी ४ लाख ५६ हजार ४७२ मतांसह विजय साकारला होता, तर काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल यांना २ लाख ५३ हजार ३५६ मते मिळाली होती.

टॅग्स :akola-pcअकोलाLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालSanjay Dhotreसंजय धोत्रेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरHidayat patelहिदायत पटेल