लाेकमत न्यूज नेटवर्कAkola Lok Sabha Results 2024 :अकोला लोकसभा मतदार सघातून काॅंग्रसचे उमेदवार यांनी ३,३६९ मंताची आघाडी घेतली असून,चाैथ्या फेरीअखेर त्यांना ६७,७२१ मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड प्रकाश आंबेउकर ४८,७८१ मते पडली असून ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. भाजपाचे उमेदवार अनुप धाेत्रे यांना ६४,३५२ मते घेऊन तिसऱ्या स्थानी आहेत्
पहिल्याफेरीपासूनच डाॅण अभय पाटील हे आघाडीवर आहेत् अकोल्यात भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे, काॅंग्रेसचे उमेदवार डॉ.अभय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर रिंगणात उभे आहेत. यंदाची लढत अत्यंत अटीतटीची होणार असल्याची शक्यता निकालाच्या आधीपासूनच वर्तविण्यात येत हाेती् तशीच ती हाेत असून,चाैथ्याफेरी अखेर काॅंग्रसेचे उमेदवार पाटील ३,३६९ घेऊन आघाडीवर आहेत़ मतमाेजणीच्या २८ फेऱ्या हाेणार आहेत़ त्यापैकी चार फेऱ्यांचा निकाल समाेर आला आहे़
अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गेल्या २६ एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले. मतदानानंतर मतदारसंघात रिंगणातील १७ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांमध्ये सीलबंद झाले. सर्वच उमेदवारांना विजयाची अपेक्षा असली तरी मतदारसंघात प्रामुख्याने महायुती, महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी आणि काट्याची लढत होत आहे.
२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत लोकसभा मतदारसंघात मतांचे घुवीकरण झाले होते. तीन प्रमुख उमेदवारांमध्ये तीन मोठ्या धर्माचे मतदान विभागले गेले. त्यात भाजपला मोदी लाटेची साथ मिळाल्याने सर्व सहाही विधानसभा मतदारसंघातून भाजपला मोठी आघाडी मिळाली होती. त्यातही अकोट, अकोला पूर्व, अकोला पश्चिम आणि बाळापूर मतदारसंघांतून भाजपला अपेक्षेपेक्षा जास्त आघाडी मिळाली होती. २०१९च्या लोकसभा निवडणुकीनंतर आलेल्या विधानसभा निवडणुकीत अकोला पूर्वमध्ये भाजपला लाखाच्यावर मतदान झाले होते. त्याखालोखाल अकोला पश्चिममध्ये मतदान होते. येथे भाजपचा निसटता विजय झाला होता.