अकोला : अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक केवळ ५८ क्विंटल आहे.मुग,उडीदाची आवक मात्र या आठवड्यात वाढली पण उत्पादन खर्चावर आधारित दर मिळत नसल्याने सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना शेतमाल विकणे हाच पर्याय आहे.शासनाने आधारभूत जाहीर केले पण शासकीय खरेदी केंद्र अद्याप सुरू करण्यात आले नाही. मागील काही वर्षापासून हीच स्थिती आहे. मग कापूस असो की, इतर शेतमाल खरे तर खरीप हंगाम सुरू होताच, शासनाने शासकीय खरेदीची तयारी करणे अपेक्षीत आहे पण होतच नसल्याने शेतकºयांना अत्यंत कमी दरात शेतमाल विकावा लागतो. वेळेवर खरेदी केंद्र सुरू न केल्याने मागील दोन वर्षापासून सोयाबीन आधारभूत किंमतीपेक्षा एक हजार रू पये कमी किंमतीने शेतकºयांना सोयाबीन विकावे लागले. मागीलवर्षी तर प्रतिक्ंिवटल १,८०० रू पये दराने शेतकºयांना शेतमाल विकावा लागला.कापसाच्या बाबतीतही तेच होत आहे. अनेक भागात कापूस पीक बाजारात आले आहे पण अद्याप आधारभूत किंमतीनुसार खरेदी केंद्र सुरू करण्याच्या कोणत्याच हालचाली नाहीत. मुगाचा तर हंगाम संपला पंरतु अद्याप खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही. या मागची कारणे काय हाच प्रश्न शेतकºयांसमोर आहे.ज्या काही शेतकºयांनी शेतमाल नंतर विकला त्या शेतकºयांना अद्याप चुकारेही मिळाले नाहीत. ही यंत्रणा शेतकºयांच्या की व्यापाºयांचा बाजूने असा प्रश्न वारंवार विचारला जात आहे. आता नवीन सोयबीन बाजारात येत आहे. कापसाची आवकही सुरू झाली आता तरी याबाबत शासनस्तरावर शासकीय खरेदी केंद्राचा निर्णय घेवून अंमलबजावणी केली जाते का, याकडे शेतक ºयांचे लक्ष लागले आहे.शासकीय खरेदी केंद्र सुरू होतील या अपेक्षेने शेतकºयांनी मागच्या आठवड्यात मूग, उडीद राखून ठेवला होता पण खरेदी केंद्र तर सुरू झालेच नाही दरही वाढले नसल्याने शेतकºयांनी मुग,उडीद विक्रीस काढल्याने बाजारातील आवक वाढली.