शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

अकोला बाजारपेठेत हरभरा, सोयाबीनचे दर घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 12:56 PM

बाजारगप्पा : भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

- राजरत्न सिरसाट ( अकोला )

अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभऱ्याचे दर मागील पंधरा दिवसांत कमी झाले असून, यामुळे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. शुक्रवारी बाजारात ५६ क्विंटल हरभरा विक्रीला आला होता. प्रतिक्विंटल  सरासरी ३९०० रुपये दर हरभऱ्याला मिळाला. आवक कमी असूनही हरभऱ्याला भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

बाजारात सोयाबीनचे दर गेल्या आठवड्यापासून स्थिर असून, ते वाढण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. मागील महिनाभरापूर्वी सोयाबीनचे दर ३३५० रुपयांपर्यंत वाढले होते. या आठवड्यात हे दर सरासरी ३१९० रुपयांपर्यंत खाली आहे. दर वाढतील या आशेने अनेक शेतकऱ्यांनी घरात सोयाबीन साठवून ठेवले आहे. मात्र, दर वाढत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

यावर्षी शासकीय खरेदी केंद्र सुरू  करण्यात विलंब झाला असून, अद्याप पूरक खरेदी केंदे्र सुरू  झाली नाहीत; पण मागील महिन्यात बाजारातील दर प्रतिक्ंिवटल ३३५० रुपयांपर्यंत वाढले होते, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. शासनाने सोयाबीनचे आधारभूत दर ३३९९ रुपये प्रतिक्ंिवटल जाहीर केलेले आहेत. बाजारात प्रतिक्ंिवटल सरासरी ३३५० रुपये शेतकऱ्यांना मिळत होते, तोपर्यंत चिंता नव्हती. आता दरात घट सुरू  झाली असून, दर वाढतील, या प्रतीक्षेत बाजारातील सोयाबीनची आवकही घटली आहे. शुक्रवारी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २१६५ क्विंटल सोयाबीन विक्रीस आले होते. या आठवड्यात ही सरासरी आवक आहे. मागच्या महिन्यात हीच आवक सरासरी चार हजार क्विंटल. तर मागील आठवड्यात ही आवक घटून सरासरी अठराशे क्विंटलपर्यंत आली होती.

मागील आठवड्याचा विचार केला तर आवकमध्ये तीनशे क्विंटलनी वाढ झाली आहे. सोयाबीनच्या दरात वाढ होईल अशी शक्यता अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वर्तुळात वर्तविली जात होती. शेतकऱ्यांना मात्र अद्यापही शासकीय धोरणात बदल होऊन दर वाढतील, अशी अपेक्षा आहे.

कपाशीची आधारभूत किंमत प्रतिक्विंटल कापसाच्या आखूड, लांब धाग्यानुसार ५१५० ते ५४५० रुपये होती; तथापि, डिसेंबर महिन्यात कापसाचे दर अचानक घटले असून, प्रतिक्विंटल ५०० ते ६०० रुपयांनी कमी झाल्याने कापसानेही शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान, तीळ या तेलबिया पिकाच्या दरात या आठवड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उडदाची प्रतिक्विंटल सरासरी ४५०० रुपये, मूग ५१०० रुपये, तूर ४५०० रुपये तर तुरीची आवक ५२१ क्विंटल होती. मक्याची आवक शुक्र वारी ९ क्विंटल होती तर मक्याला सरासरी भाव १८०० रुपये मिळाला. बाजरीची आवक सहा क्विंटल होती. बाजरीला सरासरी भाव अठराशे रुपये मिळाला. तर ज्वारीला सरासरी अठराशे रुपये भाव मिळाला.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी