अकोला: महापालिक ा प्रशासनासमोर यंदा शहरात तब्बल १८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. गतवर्षी मनपा प्रशासनाने वृक्षांची लागवड करताना ‘जीपीएस’प्रणालीचा वापर केला होता, हे विशेष. त्यामुळे गतवर्षात किती झाडे बहरली, याचाही शोध घेण्याची गरज आहे. १८ हजार वृक्षांपैकी १२ हजार वृक्ष शहरात निश्चित करण्यात आलेल्या ‘हरित पट्ट्या’त(ग्रीन झोन)लावल्या जाणार आहेत.उन्हाळ््यात अकोला शहराचा चढलेला पारा नागरिकांना असह्य ठरतो. उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढत चालली असून, ती कमी करण्यासाठी केवळ वृक्ष लागवड करणे व त्यांचे संगोपन करण्याचा एकमेव पर्याय आहे. महापालिका प्रशासनाच्यावतीने दरवर्षी पावसाळ््यात वृक्ष लागवडीची मोहीम राबवल्या जाते. गतवर्षी शहरात ६ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली होती. त्यावेळी झाडे लावत असताना बांधकाम विभागाच्यावतीने मोबाइलमधील ‘जीपीएस’ प्रणालीचा वापर करून त्यांची नोंद घेण्यात आली होती. यंदा मनपा प्रशासनाला १८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट मिळाले असून, त्यानुषंगाने प्रशासन कामाला लागले आहे.गतवर्षी ‘जीपीएस’प्रणालीचा वापरमनपा प्रशासनाने गतवर्षी शहराच्या विविध भागात सहा हजार वृक्षांची लागवड केली होती. त्यामध्ये सामाजिक संघटना, शाळा, महाविद्यालयांची मदत घेण्यात आली होती, तसेच महापालिका शाळेतील शिक्षकांना प्रती व्यक्ती पाच वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट दिले होते. वृक्ष लागवड करताना त्यांची ‘जीपीएस’प्रणालीद्वारे नोंद घेणे बंधनकारक होते. वृक्ष लागवडीच्या मोहिमेला मोठ्या उत्साहात प्रारंभ केला जात असतानाच त्यापैकी किती वृक्षांचे संगोपन होते, याची मनपा प्रशासनाने नोंद घेण्यासाठी यंदा सुद्धा ‘जीपीएस’प्रणालीचा वापर करण्याची गरज आहे.‘ग्रीन झोन’मध्ये १३ हजार वृक्ष लागवड१८ हजार वृक्षांपैकी १२ हजार वृक्षांची लागवड शहराच्या विविध भागातील निर्माणाधिन ‘ग्रीन झोन’मध्ये केली जाणार आहे. सद्यस्थितीत मनपाच्या स्तरावर शहरातील १२ खुल्या भूखंडांवर हरित पट्टे निर्माण केले जात आहेत. याठिकाणी १२ हजार वृक्ष लावल्या जातील. यामुळे शहराचे तापमान कमी होण्यासोबतच पर्यावरणाच्या संवर्धनाला हातभार लागणार असल्याचा आशावाद व्यक्त केला जात आहे.
अकोला मनपा करणार १८ हजार वृक्षांची लागवड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 2:03 PM
अकोला: महापालिक ा प्रशासनासमोर यंदा शहरात तब्बल १८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. गतवर्षी मनपा प्रशासनाने वृक्षांची लागवड करताना ‘जीपीएस’प्रणालीचा वापर केला होता, हे विशेष.
ठळक मुद्दे१८ हजार वृक्षांपैकी १२ हजार वृक्ष शहरात निश्चित करण्यात आलेल्या ‘हरित पट्ट्या’त(ग्रीन झोन)लावल्या जाणार आहेत.गतवर्षी शहरात ६ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली होती.