अकोला : मनपा प्रशासनाने सादर केलेला १८६ कोटी १२ लाखांचा अर्थसंकल्प सत्ताधारी भाजपने अवघ्या ४५ मिनीटात मंजूर करून महापालिकेच्या इतिहासात नवीन विक्रम प्रस्थापित केला. अर्थसंकल्पावर सविस्तर चर्चा करणे अपेक्षित असताना सत्ताधार्यांनी चर्चेला पूर्णविराम देत मनपाची अर्थसंकल्पीय सभा गुंडाळली.महापालिका प्रशासनाने अवाजवी खर्चाला कात्री लावत १८६ कोटी १२ लाख उत्पन्नाचा ह्यरिअँलिस्टिकह्ण अर्थसंकल्प मनपाच्या मुख्य सभागृहात शनिवारी सादर केला. सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या सभेत अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदींवर चर्चा न करता सर्वपक्षीय नगरसेवकांनी शहरातील अस्वच्छता, पथदिवे, पाणीपुरवठा आदी विषयांवर अधिकार्यांना धारेवर धरले. दुपारी पावणेचार वाजता अर्थसंकल्पीय सभेला सुरुवात झाली असता, मुख्य लेखाधिकारी दिनकर बावस्कर यांनी सभागृहात मनपाचे वार्षिक उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ सादर केला. बावस्कर यांचे बोलणे पूर्णपणे ऐकून न घेता भाजप-शिवसेना, काँग्रेसच्या नगरसेवकांनी हातात माइक घेऊन वाटेल त्या विषयांवर सूचना सादर केल्या. एकाच वेळी दोन ते तीन नगरसेवक महापौर विजय अग्रवाल तसेच आयुक्त अजय लहाने यांच्यासोबत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करीत असल्याचे चित्र सभागृहात पाहावयास मिळाले. या गोंधळाचा फायदा घेत महापौर विजय अग्रवाल यांनी १८६ कोटी १२ लाखांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली. नगरसेवकांना स्वेच्छा निधीत "इन्टरेस्ट"खासगी शाळांच्या तुलनेत सेमी इंग्लिश, इंग्लिश माध्यमाचा अभाव असणार्या मनपा शाळा विद्यार्थ्यांच्या पटसंख्येअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी अत्याधुनिक स्वच्छतागृहांचा अभाव आहे. मनपाच्या उत्पन्न वाढीसाठी अनेक विषयांवर चर्चा न करता नगरसेवकांना स्वेच्छा निधीत ह्यइन्टरेस्टह्ण असल्याचे दिसून आले. अर्थसंकल्पात प्रत्येक नगरसेवकासाठी वार्षिक २0 लाखांची तरतूद केली असताना अनेक नगरसेवकांना ही रक्कम दहा लाखांची असल्याचा साक्षात्कार झाला. त्यामध्ये दहा लाखांनी वाढ करावी, या मागणीसाठी सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापौरांकडे तगादा लावल्याचे चित्र समोर आले. यांनी मांडल्या सूचना!मनपाचा आस्थापना खर्च ६४ टक्के झाला असून, त्याला नियंत्रण ठेवण्याचे मत हरीश आलिमचंदानी यांनी मांडले. कापशी तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी १ कोटी ६१ लाख निधी कमी आहे. त्यामध्ये वाढ करा, असे सांगितले. फॉगिंग मशीनसाठी आणखी ३0 लाखांची तरतूद करण्याचे मत आलिमचंदानी यांनी मांडले. बालवाडीसाठी २0 लाख रुपये कमी असून, त्यामध्ये वाढ करण्याची सूचना त्यांनी केली. शहरात भूगर्भातील जलसाठय़ात घसरण होत असल्याने व्यावसायिक तसेच रहिवासी इमारत उभारणार्या व्यावसायिकांना रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे करण्याची मागणी भाजपचे गटनेता राहुल देशमुख यांनी लावून धरली. इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग उभारल्यानंतरच काम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र देण्याची तरतूद करावी, अशी सूचना देशमुख यांनी केली. प्रशासनाने ही सूचना मान्य केली. मनपा शाळांमध्ये मूलभूत सोयी-सुविधा देण्यासाठी निधीत वाढ करण्याची सूचना सुमन गावंडे यांनी केली. शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी गुंठेवारी जमिनीच्या मुद्यावर सूचना केल्या. पाणीपुरवठय़ासाठी दोन नवीन टॅँकर खरेदी करण्याची सूचना सतीश ढगे यांनी केली.
अकोला महापालिकेचा १८६ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर
By admin | Published: April 30, 2017 3:23 AM