शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
5
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
6
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
7
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
8
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
9
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
10
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
11
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
12
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
13
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
14
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
15
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
16
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
17
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
18
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
19
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
20
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?

अकोला महापालिकेचे ‘एलईडी’ खांबावरून लंपास; मनपाकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 3:46 PM

अकोला: महापालिका प्रशासनाने शहराच्या विविध भागात लख्ख उजेड देणारे एलईडी पथदिवे लावण्यास सुरुवात केली आहे. बाजारभावानुसार एलईडी लाइट महाग असल्याचे ध्यानात घेता चोरट्यांनी त्यांची नजर आता सदर लाइटकडे वळविल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देअकोट रोड, आपातापा रोडवर लावण्यात आलेल्या खांबावरून एक दोन नव्हे, तर चक्क सहा एलईडी लाइटची चोरी . मनपाच्या विद्युत विभागाकडे तक्रार केल्यानंतर मनपाच्यावतीने गुरुवारी अकोट फैल पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदविण्यात आली आहे.

अकोला: महापालिका प्रशासनाने शहराच्या विविध भागात लख्ख उजेड देणारे एलईडी पथदिवे लावण्यास सुरुवात केली आहे. बाजारभावानुसार एलईडी लाइट महाग असल्याचे ध्यानात घेता चोरट्यांनी त्यांची नजर आता सदर लाइटकडे वळविल्याचे दिसून येते. उत्तर झोनमधील अकोट रोड, आपातापा रोडवर लावण्यात आलेल्या खांबावरून एक दोन नव्हे, तर चक्क सहा एलईडी लाइटची चोरी झाल्याचा प्रकार प्रभाग क्रमांक-२ च्या नगरसेविका चांदनी शिंदे यांचे पती रवी शिंदे यांच्या निदर्शनास आला. याप्रकरणी मनपाच्या विद्युत विभागाकडे तक्रार केल्यानंतर मनपाच्यावतीने गुरुवारी अकोट फैल पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदविण्यात आली आहे.मनपा प्रशासनाच्यावतीने शहरातील मुख्य रस्त्यांसह प्रभागातील अंतर्गत रस्त्यांवर सीएफएल पथदिवे लावण्यात आले होते. सीएफएलमुळे वीज देयकात बचत होत असल्याचा दावा केला जात असला, तरी त्याच्या अंधुक प्रकाशामुळे नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याची परिस्थिती होती. अनेकदा पथदिव्यातील चार नळ्यांऐवजी दोन किंवा चक्क एका नळीच्या उजेडावरच संबंधित कंत्राटदार वेळ निभावून नेत होता. हा प्रकार सर्वत्र असल्यामुळे शिवाय सीएफएलच्या अंधुक उजेडामुळे होणारा त्रास लक्षात घेता केंद्रासह राज्य शासनाने आता केवळ एलईडी लाइटचा वापर करण्याचे स्वायत्त संस्थांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच एलईडी पथदिवे लावण्यासाठी थेट केंद्र शासनाने मंजुरी दिलेल्या ‘ईईएसएल’ कंपनीची नियुक्ती केली आहे. यादरम्यान, महापालिका प्रशासनाने शहरातील प्रमुख रस्त्यांसह विविध प्रभागांमध्ये एलईडी लाइट कार्यान्वित केले आहेत. लख्ख उजेड देणाऱ्या लाइटची किंमत बाजारभावानुसार जास्त असल्यामुळे आता चोरट्यांनी या लाइटवरच हात साफ केल्याचा प्रकार उजेडात आला आहे.मुख्य रस्त्यांवरून लाइटची चोरीउत्तर झोन अंतर्गत येणाºया अकोट रोड व आपातापा रोडवर लावण्यात आलेल्या सहा एलईडी पथदिव्यांची चोरी झाल्याचा प्रकार काँग्रेसच्या नगरसेविका चांदनी शिंदे यांचे पती रवी शिंदे यांच्या निदर्शनास आला. हा प्रकार मनपाच्या लक्षात आणून दिल्यानंतर विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता अभय जवंजाळ यांनी गुरुवारी अकोट फैल पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवली. मुख्य रस्त्यावरील खांबावर चढून लाइटची चोरी करण्याचे धाडस करणारे विद्युत क्षेत्राशी संबंधित असल्याचा कयास लावला जात आहे. त्या दिशेने पोलिसांसह मनपा प्रशासनाने तपास सुरू केल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका