अकोला : आग विझविण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या ताफ्यात नवीन वाहनाचा समावेश करण्यात आला. सोमवारी महापौर विजय अग्रवाल, स्थायी समिती सभापती बाळ टाले, उपमहापौर वैशाली शेळके, महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या हस्ते नवीन वाहनाचा लोकार्पण सोेहळा पार पडला.महापालिकेची हद्दवाढ होऊन शहराचा विस्तार तब्बल पाच पटीने वाढला आहे. उन्हाळ््यात आग लागण्याच्या घटनांमध्ये होणारी वाढ व शहराचा भौगोलिक विस्तार पाहता मनपाच्या अग्निशमन विभागाकडे आग विझविण्यासाठी वाहनांची पुरेशी संख्या असणे क्रमप्राप्त ठरते. ही बाब लक्षात घेऊन महापौर विजय अग्रवाल यांनी नवीन वाहन खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. नवीन वाहनाची खरेदी केल्यानंतर सोमवारी महापौर विजय अग्रवाल, स्थायी समिती सभापती बाळ टाले, उपमहापौर वैशाली शेळके, महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या हस्ते वाहनाचा लोकार्पण सोहळा पार पडला. याप्रसंगी नगरसेवक अनिल मुरूमकार, विशाल इंगळे, उपायुक्त सुरेश सोळसे, राजेंद्र घनबहाद्दूर, अग्निशमन अधिकारी रमेश ठाकरे, विलास शेळके, सागर शेगोकार, प्रवीण जगताप, वसंत मोहोकार, नागोराव निंबरते, विश्वनाथ शिंदखेडकर, प्रकाश फुलंबरकर, दीपक दाणे, विक्रमसिंह ठाकूर, नीलेश शिरसाट, बाळू घेघाटे, संजय ठाकूर, कैलास गाडवे आदी उपस्थित होते.
अकोला महापालिका अग्निशमन विभागाच्या ताफ्यात नवीन वाहन दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 1:43 PM
अकोला : आग विझविण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या ताफ्यात नवीन वाहनाचा समावेश करण्यात आला. सोमवारी महापौर विजय अग्रवाल, स्थायी समिती सभापती बाळ टाले, उपमहापौर वैशाली शेळके, महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या हस्ते नवीन वाहनाचा लोकार्पण सोेहळा पार पडला.
ठळक मुद्देमहापालिकेची हद्दवाढ होऊन शहराचा विस्तार तब्बल पाच पटीने वाढला आहे.शहराचा भौगोलिक विस्तार पाहता मनपाच्या अग्निशमन विभागाकडे आग विझविण्यासाठी वाहनांची पुरेशी संख्या असणे क्रमप्राप्त ठरते. महापौर विजय अग्रवाल, स्थायी समिती सभापती बाळ टाले, उपमहापौर वैशाली शेळके, महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या हस्ते नवीन वाहनाचा लोकार्पण सोेहळा पार पडला.