अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला असून, रविवार, २१ फेब्रुवारी रोजी आणखी एक रुग्णाचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ३५३ झाली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २८८, तर रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांमध्ये ५४ अशा एकूण ३४२ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १३,९३५ वर पोहोचली आहे. दरम्यान, ८९ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ११५७ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी २८८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ८६९ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये अकोट येथील ४९, डाबकी रोड येथील १०, खानापूर ता.पातूर व गोरक्षण रोड येथील प्रत्येकी आठ, कौलखेड येथील सात, गीता नगर, मलकापूर, जठारपेठ व मोठी उमरी येथील प्रत्येकी पाच, तेल्हारा, खिरपुरी बु., जीएमसी, सिंधी कॅम्प, तापडीया नगर व रामदासपेठ येथील प्रत्येकी चार, बोरगाव मंजू, जिल्हा कोर्ट, बाळापूर, उगवा, मालीपुरा, गोडबोले प्लॉट व राम नगर येथील प्रत्येकी तीन, वस्तापूर, गजाननपेठ, तुकाराम चौक, अंदुरा, भिम नगर, किर्ती नगर, केदार मंदीर, लहान उमरी, बाळापूर रोड व आश्रय नगर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित कपिलेश्वर, अखातवाडा, खोबेरखेड, अपोती खु, अणकवाडी, अंबिकापूर, लाहोरा ता.बाळापूर, दुर्गा चौक, बोरगाव मंजू, भागवतवाडी, जवाहर नगर, बैदपूरा, नयागाव रोड, वाशिम बायपास, उमरी, विझोरा, रजपूतपुरा, हिंगणा रोड, जूने शहर, गायत्री नगर, रिधोरा, खानापूर वेस ता.अकोट, आसेगाव ता.अकोट, अकोला जहॉगीर ता.अकोट, वनी वेताल ता.अकोट, रतनलाल प्लॉट, ज्ञानेश्वर नगर, शिवन नगर, पार्वती नगर, डिएसपी ऑफीस, राऊतवाडी, केशव नगर, सहकार नगर, पत्रकार कॉलनी,शास्त्री नगर, अशोक वाटिका, अकोट फैल, व्दारका नगरी, सातव चौक, रामदोगण प्लॉट, नरेंद्र नगर, गंगाधर प्लॉट, रणपिसे नगर, बार्शीटाकळी, वैष्णवी पार्क, पिंपळखुटा ता.बार्शिटाकळी, कान्हेरी सरप, आळदा ता.बार्शीटाकळी, चिंचोली बार्शीटाकळी, राधेनगर, खोलेश्वर लोहिया, मनकर्णा प्लॉट, सूधीर कॉलनी, तिलक रोड व मराठा नगर येथील प्रत्येकी एक अशा २२२ रुग्णांचा समावेश आहे. सायंकाळी गोरक्षण रोड येथील ११, कौलखेड व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी चार, जठारपेठ, केशव नगर, डाबकी रोड व मलकापूर येथील प्रत्येकी तीन, जवाहर नगर, खडकी, सहकार नगर, मुर्तिजापूर व उमरी येथील प्रत्येकी दोन, तुकाराम चौक, राम नगर, दुर्गा चौक, रतनलाल प्लॉट, पिकेव्ही क्वॉटर, बाळापूर रोड, लहान उमरी, हिंगणा रोड, कुरुम, तापडीया नगर, आनंद नगर, जूने शहर, अंबिका नगर, शास्त्री नगर, देशमुख फैल, कोठारी वाटीका, गोविंद नगर, तोष्णीवाल लेआऊट, कृषी नगर, पोलीस हेडक्वॉटर, संजय नगर, अकोट फैल, न्यु भीम नगर, रणपिसे नगर व जीएमसी येथील प्रत्येकी एक अशा ६६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
मुर्तीजापूर येथील पुरुष दगावला
कोरोनाला बळी पडणऱ्यांचा आकडा वाढतच आहे. रविवारी मुर्तिजापूर येथील ८८ वर्षीय पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना १० फेब्रुवारी रोजी रोजी दाखल करण्यात आले होते.
८९ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १६, आयकॉन हॉस्पीटल येथून सात, ओझोन हॉस्पीटल येथून तीन, हॉटेल स्कायलार्क येथून चार, बिहाडे हॉस्पीटल येथून तीन, सूर्यचंद्र हॉस्पीटल येथून आठ, अवघाते हॉस्पीटल येथून सहा, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथून १०, तर होम आयसोलेशनचा कालावधी संपलेले ३२ अशा एकूण ८९ जणांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला.
१,९७९ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १३,९३५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ११,५८५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३५३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत १,९७९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.