अकोला : अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला श्रावण महिन्यात शहराचे पूर्णा नदीच्या पाण्याने जलाभिषेक करण्याची परंपरा असलेल्या कावड यात्रेत यावर्षी केवळ राजराजेश्वरांच्याच पालखीचा समावेश असेल.पालकमंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थित बुधवारी झालेल्या बैठकीत शिवभक्तांनी या निर्णयाला एकमताने संमती दिली आहे.श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी होणारा कावड यात्रा महोत्सव हा अकोल्यातील सर्वात मोठा लोकोत्सव आहे यावर्षी १७ आॅगस्ट रोजी शेवटचा श्रावण सोमवारी आहे. मात्र कोरोना विषाणूचे सावट लक्षात घेता पालकमंत्री ना.बच्चू कडू तसेच जिल्हा प्रशासनाने सर्व शिवभक्तांची बैठक घेऊन या संदर्भात चर्चा केली. दरवर्षी कावड यात्रेत सहभागी होणाऱ्या मंडळानी यावर्षी कावड यात्रेत सहभाग न घेता केवळ मानाची पालखी असलेल्या श्री राजराजेश्वाराचीच पालखीला कावड यात्रेची परवानगी देण्यात यावी यावर सर्वांची एकमत झाले. कावड उत्सवला ७६ वर्षाची परंपराशहराच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेला जोपासणाºया पालखी व कावड उत्सवाला यंदा ७६ वर्षे पूर्ण होत आहेत. श्रावण महिन्यातील शेवटच्या चौथ्या सोमवारी गांधीग्राम येथील पूर्णा नदीचे जल घेऊन कावडधारी आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला जलाभिषेक करतात. त्यांच्या स्वागतासाठी अकोलेकर ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारून चहा, नाश्ता, फराळ आदी व्यवस्था उभारतात. दरवर्षी असणारे हे चित्र यावर्षी दिसणार नाही.