लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पद्मावत चित्रपटाच्या कथानकावरून देशभरात रणकंदन सुरू आहे. करणी सेना, अखिल भारतीय क्षत्रिय महासभा व हिंदू संघटनांनी हा चित्रपट प्रदर्शनास विरोध केला. अकोला शहरातसुद्धा त्याचे पडसाद उमटले आहेत. गुरुवारी शहरातील राधाकृष्ण चित्रपटगृहामध्ये पद्मावत चित्रपट प्रदर्शित झाला; परंतु अ.भा. क्षत्रिय महासभेने अकोल्यातसुद्धा या चित्रपटाला कडाडून विरोध केल्यामुळे चित्रपटगृह संचालकांनी या चित्रपटाचे शो रद्द केले. गुरुवारी पद्मावतचा एकही शो झाला नाही. चित्रपटाला होत असलेला विरोध पाहता, पोलिसांनी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला. पद्मावत चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच देशभरामध्ये या चित्रपटाला विरोध करण्यात आला. या चित्रपटामध्ये काही फेरबदल केल्यानंतरही करणी सेना, क्षत्रिय राजपूत, अ.भा. क्षत्रिय महासभेने या चित्रपटाच्या प्रदर्शनास कडाडून विरोध केला. या चित्रपटाला होत असलेला विरोध पाहता आणि चित्रपटगृहामध्ये कोणतीही अनुचित घटना घडू नये, या दृष्टिकोनातून राधाकृष्ण चित्रपटगृहाच्या संचालकांनी या चित्रपटाचे शोच रद्द करून टाकले; परंतु चित्रपटगृहासमोर खदान पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. या चित्रपटाबाबत उत्सुकता असलेल्या रसिकांची मात्र, शो रद्द झाल्यामुळे घोर निराशा झाली. या चित्रपटामध्ये महाराणी पद्मावती यांच्याविषयीचा चुकीचा आणि बीभत्स इतिहास मांडण्यात आला असून, हा चित्रपट आमच्या धार्मिक भावनांना ठेच पोहोचविणारा असल्याने, या चित्रपटाचे प्रदर्शन होऊ न देण्याचा निर्धार अ.भा. क्षत्रिय महासभेने केला आहे.
अकोला : पद्मावत चित्रपटाचे शो रद्द; चित्रपटगृह चालकाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 2:25 AM
अकोला : पद्मावत चित्रपटाच्या कथानकावरून देशभरात रणकंदन सुरू आहे. करणी सेना, अखिल भारतीय क्षत्रिय महासभा व हिंदू संघटनांनी हा चित्रपट प्रदर्शनास विरोध केला. अकोला शहरातसुद्धा त्याचे पडसाद उमटले आहेत.
ठळक मुद्देचित्रपटगृहासमोर पोलीस बंदोबस्त : क्षत्रिय राजपूत समाजाचा विरोध