अकोला: जीवघेण्या कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने टाळेबंदी जाहीर केली. यामुळे सर्व उद्योग-व्यवसाय ठप्प झाले आहेत. ही बाब लक्षात घेता यावर्षी थकीत मालमत्ता करावर शास्ती (दंडात्मक व्याज)ची आकारणी न करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. हा अकोलेकरांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्तांचे १९९८ पासून ते २०१६ पर्यंत पुनर्मूल्यांकन रखडले होते. २०१६ पूर्वी मनपाच्या दप्तरी ७१ हजार मालमत्ता होत्या. प्रशासनाने केलेल्या मूल्यांकनानंतर त्यामध्ये वाढ होऊन १ लाख ४ हजार व हद्दवाढ झालेल्या क्षेत्रात ५० हजार अशा एकूण १ लाख ५४ हजार मालमत्तांची नोंद करण्यात आली. यापासून मनपाला दरवर्षी ७० कोटींचे उत्पन्न प्राप्त होण्याचा प्रशासनाला अंदाज होता. चालू व थकीत मालमत्ता कराच्या एकूण १३५ कोटींपैकी आजवर मालमत्ता कर वसुली विभागाने केवळ ३७ कोटींची वसुली केली आहे. पुढील दिवसांत महापालिकेला ९६ कोटी रुपये जमा करावे लागतील.थकबाकीदारांना दिलासादरवर्षी नियमितपणे मालमत्ता कराचा भरणा करणाऱ्या मालमत्ताधारकांसाठी हा दिलासा मानला जात आहे. यामध्ये १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या चालू आर्थिक वर्षातील थकबाकीदारांसाठीच ही शास्ती माफ करण्यात आली आहे.
टॅक्स जमा करण्याची मुदत वाढविली!या स्थितीत मनपाकडे मालमत्ता कर जमा करणाºया अकोलेकरांना प्रशासनाने टॅक्सची थकीत रक्कम जमा करण्यासाठी ३१ मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
अकोलेकरांनी मालमत्ता कराची थकबाकी प्रशासनाकडे जमा करावी, मालमत्ता कराचा थकीत आकडा लक्षात घेता भविष्यात त्याचा परिणाम मूलभूत सोयी-सुविधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.- संजय कापडणीस,आयुक्त, मनपा.