अकोला : उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोयडा येथे १७ ते १९ डिसेंबर दरम्यान पार पडलेल्या पाचव्या राष्ट्रीय मार्शल आर्ट गेम स्पर्धेत तायक्वांदो प्रकारात अकोल्याच्या खेळाडूंनी महाराष्ट्र संघाकडून खेळताना घवघवीत यश संपादन केले. गणेश परमेश्वर वानखडे याने सुवर्ण पदक, तर गणेश संतोष पिंपळे याने कांस्य पदकांची कमाई केली.
या स्पर्धेत महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, तेलंगाणा, जम्मू-काश्मीर, आसाम, मनीपूर, प. बंगाल आदी राज्यातील खेळाडू सहभागी झाले होते. अकोला जिल्ह्यातील खेळाडूंना आरती कोल्हे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. राष्ट्रीय मार्शल आर्ट कमिटी अध्यक्ष आर. के, भारत व महाराष्ट्र सचिव अनंत पाचकवडे, तसेच एमराल्ड पब्लिक स्कूल व भिरड कॉन्व्हेंटच्या शिक्षकांनी खेळाडूंचे कौतुक केले आहे.