सर्व स्तरावर बेस्ट कामगिरी
पोलीस महासंचालकांच्या स्पर्धेसाठी निवड
अकोला : पोलीस आयुक्तालय तसेच प्रत्येक जिल्ह्यातील पोलिस प्रशासनाच्या कामगिरीचा आढावा घेऊन त्यांचे कामकाज कशाप्रकारे आहे. यासाठी करण्यात आलेल्या मूल्यंकानामध्ये अमरावती परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यातील पोलिसांमध्ये अकोला पोलीस प्रथम क्रमांकावर आले आहेत. पोलीस महासंचालकांनी बेस्ट पोलीस युनिट ही स्पर्धा राबविण्यास सुरुवात केली असून या स्पर्धेसाठी अकोला पोलिसांची प्रथमच निवड झाल्याने अकोला पोलीसांची कामगिरी अमरावती परिक्षेत्रात गौरवास्पद ठरले आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालयासह पोलीस स्टेशन, उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या कार्यालयातील पोलीस अधिकारी कर्मचारी यांना देण्यात येत असलेली वागणूक, प्रशासकीय कामकाज, विविध गुन्ह्यातील तपास, प्रतिबंधात्मक कारवाया, गुन्हे नियंत्रण, शोधमोहीम, एम पी डी ए, झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायदा, मकोका यासह विविध स्तरावर पोलिसांची कामगिरी कशाप्रकारे आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक व त्यांचे कर्मचारी आणि आयुक्तालय स्तरावरील आयुक्त व त्यांच्या कर्मचाऱ्यांचे मूल्यांकन एका विशेष पथकाणे केले. या मूल्यांकनामध्ये अकोला पोलिसांची कामगिरी अमरावती परिक्षेत्रातील अमरावती ग्रामीण, अमरावती आयुक्तालय, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशीम या पाच जिल्ह्यातून अव्वल ठरली आहे. वरिष्ठ स्तरावरून देण्यात आलेल्या गुणतालिकेमध्ये अकोला पोलिसांची कामगिरी ही दुपटीने चांगली असल्याचेही या गुणतालिकेत मध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे अकोला पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलिस उपअधीक्षक सचिन कदम यांनी राबविलेले उपक्रम, गुन्हेगारी कमी करण्यासाठी केलेल्या उपाय योजना या सर्व स्तरावर कौतुकास्पद असल्याने अकोला पोलिसांची कामगिरी अमरावती परिक्षेत्रमध्ये प्रथम क्रमांकावर ठरल्याचे या निकालांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
आता परिक्षेत्र स्तरावर स्पर्धा अमरावती परिक्षेत्रतून अकोला पोलिसांची कामगिरी अववल असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता राज्यातील विविध परिक्षेत्रतून प्रथम आलेल्या जिल्ह्याशी अकोला पोलिसांची स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेतही अकोला पोलीस बाजी मारणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. कारण दिलेल्या गुणतालिकेमध्ये अकोला पोलिसांची कामगिरी दुपटीने चांगली असल्याचेही नमूद करण्यात आल्यामुळे अकोला पोलीस आता परिक्षेत्र स्तरावर घेण्यात येणाऱ्या स्पर्धेतही अव्वल ठरणार असल्याचा विश्वास पोलिसांना आहे.
अकोला पोलीस प्रमुखाचा पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी जे योग्य आणि चांगले करता येईल ते करण्यात आले. सुरक्षेसाठी विविध उपक्रम उपाययोजना राबविण्यात आलेल्या आहेत. महिला युवतींच्या सुरक्षेसाठी योग्य निर्णय घेण्यात आले. लहान मुलांसाठी विविध उपक्रम राबवित त्यांना सुरक्षा प्रदान करण्याचा प्रयत्न अकोला पोलिसांनी केला आहे. यासह प्रत्येक तपासात अकोला पोलिसांची कामगिरी अव्वल आहे. प्रतिबंधात्मक कारवाई एमपीडीए यासह विविध प्रकरणांमध्ये अकोला पोलिसांनी केलेली कामगिरी चांगली असल्याने हा बहुमान मिळालेला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस कर्मचारी व अधिकारी यांच्या कामाचा हा सन्मान आहे.
जी श्रीधर पोलीस अधिक्षक अकोला
फोटो घ्यावा
अकोला पोलिसांनी महिलांसाठी विविध उपक्रम राबविले आहे. कौटुंबिक हिंसाचार तसेच चार भिंतीच्या आड होणारे अत्याचार रोखण्यासाठी पोलिसांनी गोपनीय त्यावर नजर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. लहान मुलांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी विदर्भातील पहिले बालस्नेही पोलीस ठाणे अकोल्यात कार्यरत करण्यात आले आहे. तपासात अकोला पोलिसांची कामगिरी अव्वल आहे. त्यामुळेच परिक्षेत्रात अकोला पोलिसांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. सर्व पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या कामाचे फळ आहे.
मोनिका राऊत
अतिरिक्त पोलीस अधीक्षक अकोला
फोटो घ्यावा
या अधिकारी कर्मचाऱ्यांनी केली मेहनत
अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या मार्गदर्शनात पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलिस उपअधीक्षक सचिन कदम, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ, विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील, सिटी कोतवालीचे ठाणेदार उत्तम जाधव, ठाणेदार गजानन गुल्हाने, विजय नाफडे, महेंद्र कदम, महेंद्र देशमुख किशोर सोनवणे दिसती खंडेराव, अकोट ठाणेदार संतोष महल्ले, अकोट ग्रामीणचे ज्ञानोबा फड यांच्यासह जिल्ह्यातील ठाणेदार पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी प्रचंड मेहनत केली. त्यामुळे अकोला पोलीस अमरावती परिक्षेत्र प्रथम आले आहे.