शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

कोल्हापूर, मीराभाइंदर, नांदेडनंतर होणार अकोला पोलीस आयुक्तालय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2020 1:25 PM

अकोल्यातील पोलीस आयुक्तालयाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

ठळक मुद्देअकोला पोलीस आयुक्तालयाचा प्रस्ताव मात्र अद्यापही रेंगाळत पडलेला आहे. अमरावती परिक्षेत्रात सर्वाधिक गुन्हेगारी तसेच संवेदनशील शहर तसेच जिल्हा म्हणून अकोल्याची ओळख आहे.

- सचिन राऊत लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला पोलीस आयुक्तालयाचा प्रस्ताव २०१२ पासून पोलीस महासंचालक कार्यालय तसेच राज्यसरकारकडे सादर करण्यात आला असला तरी अत्यंत संवेदनशील असलेल्या अकोला पोलीस आयुक्तालयाचा प्रस्ताव मात्र अद्यापही रेंगाळत पडलेला आहे. अकोल्यानंतर मीराभाइंदर, कोल्हापूर, नांदेड आणि नाशिकमधील मालेगाव या चार ठिकाणच्या पोलीस आयुक्तालयाचा प्रस्ताव सादर करण्यात आला; मात्र आता हे चार ठिकाणचे आयुक्तालय झाल्यानंतर अकोल्यातील पोलीस आयुक्तालयाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.अमरावती परिक्षेत्रात सर्वाधिक गुन्हेगारी तसेच संवेदनशील शहर तसेच जिल्हा म्हणून अकोल्याची ओळख आहे. राजकीय हत्याकांडासह टोळीयुद्ध, संघटित गुन्हेगारीचे मोठे प्रस्थच अकोल्यात असल्याने या ठिकाणी तातडीने पोलीस आयुक्तालय कार्यान्वित करण्यासाठी तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पडवळ यांनी प्रस्ताव तयार केला. त्यानंतर आलेले पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या कार्यकाळात पोलीस आयुक्तालयासाठी कसोशीने प्रयत्न करण्यात आले; मात्र राजकीय वादात अकोल्यातील पोलीस आयुक्तालयाला केवळ हिरवी झेंडी मिळाली; मात्र प्रत्यक्षात ते कार्यान्वित करण्यासाठी आडकाठी आणण्यात आली. भाजपा सरकारच्या कार्यकाळात गृहराज्यमंत्री अकोल्याचे रणजित पाटील यांनी अकोला पोलीस आयुक्तालय कार्यान्वित करण्यासाठी पुढाकार घेतला होता. आता गृहखात्याकडून आयुक्तालय निर्मितीसाठी हालचाली सुरू झाल्या असून नांदेड, मीर भाइंदर, कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील पोलीस आयुक्तालय कार्यािन्वत झाल्यानंतरच अकोला पोलीस आयुक्तालयाचा विचार होणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी स्पष्ट केले.

पिंपरी चिंचवडपूर्वी होता प्रस्तावअकोला पोलिीस आयुक्तालयाचा प्रस्ताव पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या पूर्वीचा आहे. त्यासाठी असणारे निकषही पूर्ण करण्यात आले आहेत; मात्र आधीचा प्रस्ताव असतानाही पिंपरी चिंचवड येथे आयुक्तालय कार्यान्वित झाले तर अकोल्यातील पोलीस आयुक्तालयासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस