शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

अकोला :  जिल्हा परिषद अध्यक्षांनी मागवल्या स्वस्ती प्रदर्शनाच्या फायली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 3:16 PM

अकोला : महिला स्वयंसाहाय्यता गटामार्फत उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्रीसाठी अकोला जिल्हा परिषदेला यजमान पद मिळाल्यानंतर त्यासाठी शासनाकडून प्राप्त निधी, त्यातून काय फलनिष्पत्ती झाली, याचा शासनाकडे सादर केलेल्या अहवालासह फायली तातडीने सादर करण्याचे पत्र जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला शुक्रवारी दिले.

ठळक मुद्देविभागातील महिला बचत गटांनी निर्माण केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्रीसाठी अकोला येथे विभागीय प्रदर्शन आयोजित करण्यात आलेत्या प्रदर्शनात विभागातील पाचही जिल्ह्यातून अत्यल्प बचत गटांचा सहभाग होता.जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांनी या प्रदर्शनातील संपूर्ण प्रक्रियेसह फलनिष्पत्तीचा अहवालच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांकडून मागवला.

अकोला : महिला स्वयंसाहाय्यता गटामार्फत उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्रीसाठी अकोला जिल्हा परिषदेला यजमान पद मिळाल्यानंतर त्यासाठी शासनाकडून प्राप्त निधी, त्यातून काय फलनिष्पत्ती झाली, याचा शासनाकडे सादर केलेल्या अहवालासह फायली तातडीने सादर करण्याचे पत्र जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला शुक्रवारी दिले. त्यामुळे संबंधित अधिकारी-कर्मचाºयांची चांगलीच धांदल उडाली आहे. फायलींची जुळवाजुळव, खर्चाच्या नोंदी आधीच्या तारखांमध्ये होण्याची शक्यता असल्याने त्या नोंदीची माहितीही घेण्यात आली आहे.विभागातील महिला बचत गटांनी निर्माण केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्रीसाठी अकोला येथे विभागीय प्रदर्शन आयोजित करण्यात आले. ८ ते ११ फेब्रुवारीदरम्यान अकोल्यातील क्रिकेट क्लब मैदानावर हे प्रदर्शन पार पडले. त्या प्रदर्शनात विभागातील पाचही जिल्ह्यातून अत्यल्प बचत गटांचा सहभाग होता. तसेच प्रचार व प्रसिद्धी न झाल्याने नागरिकांचा प्रतिसादही अल्प मिळाला. त्यामुळे शासनाकडून प्राप्त निधीचा अपव्ययच अधिक झाल्याची चर्चा होती. हा प्रकार गांभीर्याने घेत जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांनी या प्रदर्शनातील संपूर्ण प्रक्रियेसह फलनिष्पत्तीचा अहवालच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांकडून मागवला. त्यासाठी शुक्रवारी दिलेल्या पत्रात त्यांनी विविध मुद्यांच्या फायलीसह अहवाल मागवले आहेत. त्यामध्ये प्रदर्शनात जिल्हानिहाय समाविष्ट झालेल्या बचत गटांची नावे, त्यांनी तयार केलेल्या वस्तू, पदार्थाची प्रदर्शनाच्या कालावधीत विक्री झाल्याचा स्टॉलनिहाय तपशील, त्याबाबत शासनाकडे सादर केलेला अहवाल, प्रदर्शनाच्या प्रसिद्धीसाठी विविध माध्यमांवर केलेला खर्च, बाहेर जिल्ह्यातून आलेल्या महिला बचत गटातील सदस्य, सोबतचे अधिकारी-कर्मचारी यांना चहा, नाश्ता, जेवणासाठी देण्यात आलेले कूपन्स व त्यावर झालेल्या खर्चाचा अहवाल वाघोडे यांनी मागविला.

  जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेची धावाधावजिल्हा परिषद अध्यक्षांचे पत्र प्राप्त होताच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील संबंधित अधिकारी-कर्मचाºयांची चांगलीच धावपळ सुरू झाली. अनेक फायली तयारच नाहीत. विविध खर्चाच्या नोंदीही नाहीत. त्या नोंदी ऐनवेळी करण्याची शक्यता असल्याने नोंदवह्यांच्या सद्यस्थितीतील छायाप्रतीही काढून घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे शासनाच्या निधीतून लाखो रुपये खर्च जुळवण्यात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील अधिकारी-कर्मचारी लागले आहेत.

 

टॅग्स :Akola cityअकोला शहरzpजिल्हा परिषदSandhya Waghodeसंध्या वाघोडे