लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरातील व्यावसायिक किशोर खत्री हत्याकांडामध्ये जिल्हा व सत्र न्यायालयात मंगळवारी असलेली सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आरोपींच्या वकिलांची प्रकृती ठीक नसल्याने ते न्यायालयात आले नाही, त्यामुळे ही सुनावणी आता २२, २३ व २४ जानेवारी रोजी ठेवण्यात आली आहे. या बहुचर्चित हत्याकांडप्रकरणी सरकार पक्षाची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील अँड. उज्जवल निकम हे उपस्थित होते. सोमठाणा शेतशिवारात ३ नोव्हेंबर २0१५ रोजी किशोर खत्री यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडप्रकरणी रणजितसिंग चुंगडे, रूपेश चंदेल, जसवंतसिंग चौहान ऊर्फ जस्सी, राजू मेहेरे हे आरोपी आहेत. सदर प्रकरणात सरकार पक्षाच्यावतीने विशेष सरकारी विधिज्ञ अँड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अकोला : शहरातील व्यावसायिक किशोर खत्री हत्याकांडाची सुनावणी पुढे ढकलली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 1:40 AM
अकोला : शहरातील व्यावसायिक किशोर खत्री हत्याकांडामध्ये जिल्हा व सत्र न्यायालयात मंगळवारी असलेली सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आरोपींच्या वकिलांची प्रकृती ठीक नसल्याने ते न्यायालयात आले नाही, त्यामुळे ही सुनावणी आता २२, २३ व २४ जानेवारी रोजी ठेवण्यात आली आहे.
ठळक मुद्देआरोपींच्या वकिलांची प्रकृती ठीक नसल्याने ते न्यायालयात आले नाहीही सुनावणी आता २२, २३ व २४ जानेवारी रोजी होणार