अकोला - जनता भाजी बाजारात सुरु असलेल्या जुगार अड्डयावर सिटी कोतवालीचे प्रभारी ठाणेदार तथा वाहतुक शाखा प्रमुख विलास पाटील यांनी मंगळवारी प्रभार स्विकारताच छापेमारी केली. महेबुब खान व अंबु सुरेखा या दोघांनी हा जुगार अड्डा सुरु केला असून या जुगारावरुन १० जनांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.जनता भाजी बाजारात मोठा जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती वाहतुक शाखा प्रमूख तथा सिटी कोतवालीचे प्रभारी ठाणेदार विलास पाटील यांना मिळाली, त्यांनी कर्मचाऱ्यांसह या जुगारावर छापा टाकला. या ठिकाणावरुन गजानन गणपतराव काकड रा. बार्शिटाकळी, विनोद केशवराव गडवे रा. महाकाली नगर बाळापुर नाका, राजेश जगदीश पाठक रा. बाळापुर नाका, अजय कृष्णराव इचे रा. शिवाजी नगर जुने शहर, निलेश शंकर काकड रा. बायपास, बिस्मील्ला खा इनायत खा रा. चांदखा प्लॉट, सुभाष दामोदर चेकेटकर रा.रतनलाल प्लॉट, संजय चरणदास लहुकर रा.हरीहर पेठ, नाजुकराव वामनराव वानखडे रा. शिवापुर व माणिक ज्ञानदेव सरदार रा. पंचशील नगर वाशिम बायपास या १० जुगारींना अटक करण्यात आली. या जुगार अड्डयावरुन ८ मोबाईलसह रोख रक्कम असा एकून ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. महेबुब खान उर्फ मब्बा पहेलवान व अमीत उर्फ अंबु सुरेखा या दोघांचा हा जुगार अड्डा असल्याची माहिती समोर आली आहे. या १० जुगारींविरुध्द सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.