शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

अकोला रेल्वे स्थानकावरील लिफ्ट उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 1:57 PM

अकोला : अकोला रेल्वे स्थानकावरील दोन्ही लिफ्टचे काम पूर्ण झाले असूून, अकोलेकर आता या लिफ्टच्या सेवेची प्रतीक्षा करीत आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे ही प्रतीक्षा करावी लागत असल्याचे बोलले जाते.

ठळक मुद्देप्रवास करणाऱ्यांना अधिक सुविधा मिळावी म्हणून अकोला रेल्वे स्थानकावर दोन लिफ्टचे बांधकाम करण्यात आले. दोन्ही लिफ्ट तयार असून, सेफ्टी सर्टिफिकेटअभावी त्या चालू शकत नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.मात्र, या प्रमाणपत्रासाठी अद्याप तरी कुणी पुढाकार घेतलेला नाही.

अकोला : अकोला रेल्वे स्थानकावरील दोन्ही लिफ्टचे काम पूर्ण झाले असूून, अकोलेकर आता या लिफ्टच्या सेवेची प्रतीक्षा करीत आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे ही प्रतीक्षा करावी लागत असल्याचे बोलले जाते.अकोल्यातून प्रवास करणाऱ्यांना अधिक सुविधा मिळावी म्हणून अकोला रेल्वे स्थानकावर दोन लिफ्टचे बांधकाम करण्यात आले. रेल्वे स्थानकावरील पश्चिम दिशेकडील ओव्हर ब्रिजजवळ आणि प्लॅटफार्म क्रमांक दोनवर या लिफ्ट तयार असून, केवळ उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. दोन्ही लिफ्ट ३१ मार्चच्या आधी बांधण्यात याव्यात, असे निर्देश रेल्वे प्रशासनाने दिले होते. मात्र, या बांधकामाला चांगलाच उशीर झाला आहे. त्यामुळे दोन्ही लिफ्ट तयार असून, सेफ्टी सर्टिफिकेटअभावी त्या चालू शकत नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, या प्रमाणपत्रासाठी अद्याप तरी कुणी पुढाकार घेतलेला नाही. अकोला रेल्वेस्थानकाचे अधीक्षक जी.बी. मीणा प्रशिक्षणासाठी असल्याने अकोला रेल्वे स्थानकावरील विकासाची सर्व कामे रेंगाळली आहेत. मध्य आणि दक्षिण मध्य रेल्वेच्या डीआरएम यांनी अकोला रेल्वेस्थानकास भेट दिली. लवकरच या कामास गती मिळेल, असे आश्वासन दिले होते. मात्र, पंधरवडा होऊनही या कामाची गती अद्याप जैसे थे आहे. लोकप्रतिनिधींनी यात पुढाकरा घ्यावा, असा सूरही आता समोर येत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Railway Stationअकोला रेल्वे स्थानक