लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : रेल्वे स्थानकावर सीसी कॅमेरे लावण्याच्या मागणीला मूर्त रूप मिळत असून, रेल्वे प्रशासनाने कॅमेरा खरेदीसाठी निविदा मागविल्या आहेत. काही महिन्यातच हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती भुसावळ येथे २६ सप्टेंबर रोजी झालेल्या डीआरयूसीसी सदस्यांच्या बैठकीत दिली. यामध्ये खासदारांनी नेमणूक केलेले अकोल्यातील सदस्य वसंत बाछुका आणि दीपकभाई प्रामुख्याने उपस्थित होते. अकोला रेल्वे स्थानकावरील सुविधा आणि सेवा याबाबत येथे ऊहापोह करण्यात आला. अकोला रेल्वे स्थानकावरील कार पार्किंगची जागा वाढविण्याबाबतचा विषय छेडला गेला. पार्किंग वाढविण्यासाठी येथील भिंत तोडण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे येथे सांगितले गेले. प्लॅटफार्म क्र.३ वरील इलेक्ट्रिक डिस्प्ले बोर्ड लावण्याचे काम पूर्ण झाले असून, ३0 नोव्हेंबरपासून बोर्ड अस्तिवात येईल. दादरा-पुलावर बसणार्या ४५ भिकार्यांवर रेल्वे प्रशासनाने कारवाई केली असून, सातत्याने या प्रकरणात लक्ष दिले जात आहे. कुठेही गाड्या ठेवणार्यांवर रेल्वे प्रशासनाच्यावतीने कारवाई करण्यात येणार आहे. अकोला स्टेशनवर स्वयंचलित जिन्याचा प्रारूप मसुदा पाठविला गेला आहे. उत्तर आल्यानंतर याबाबत निविदा काढली जाणार आहे. खासदार संजय धोत्रे यांनी दिलेल्या सूचनेनुसार मूर्तिजापुरात चार रेल्वे गाड्यांना थांबा देण्यावर सकारात्मक चर्चा झाली.
अकोला रेल्वे स्थानक लवकरच ‘सीसीटीव्ही’च्या नजरेत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 2:02 AM
अकोला : रेल्वे स्थानकावर सीसी कॅमेरे लावण्याच्या मागणीला मूर्त रूप मिळत असून, रेल्वे प्रशासनाने कॅमेरा खरेदीसाठी निविदा मागविल्या आहेत. काही महिन्यातच हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती भुसावळ येथे २६ सप्टेंबर रोजी झालेल्या डीआरयूसीसी सदस्यांच्या बैठकीत दिली. यामध्ये खासदारांनी नेमणूक केलेले अकोल्यातील सदस्य वसंत बाछुका आणि दीपकभाई प्रामुख्याने उपस्थित होते. अकोला रेल्वे स्थानकावरील सुविधा आणि सेवा याबाबत येथे ऊहापोह करण्यात आला.
ठळक मुद्देरेल्वे प्रशासनाने कॅमेरा खरेदीसाठी निविदा मागविल्या आहेत काही महिन्यातच हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती