अकोला : मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर जिल्ह्यातील नागरिकांचेही डोळे आकाशाकडे लागले होते. अखेर जिल्ह्यात ७ जून रोजी सायंकाळी तुरळक पाऊस बरसला. मे महिन्यामध्ये कडक उन्हाचा सामना करावा लागलेल्या अकोलेकरांना पाऊस बरसल्यामुळे दिलासा मिळाला. रविवारी दुपारी व सायंकाळी जिल्ह्यात तुरळक पाऊस बरसला. गत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे नागरिकांना उन्हाच्या कडाक्यापासून दिलासा मिळाला. त्यातच रविवारी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान किरकोळ पाऊस झाला. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता पुन्हा पाऊस झाला. अचानक पाऊस झाल्यामुळे रस्त्यावर व्यवसाय थाटणार्या व्यावसायिकांची तारांबळ उडाली. शहरातील गांधी चौक, पोस्ट ऑफीस चौक, तापडीया नगर या भागात अनेक कापड विक्रेते रस्त्यावर दुकाने थाटतात. अचानक पाऊस आल्यामुळे या व्यावसायिकांचे नुकसान झाले.
अकोला जिल्ह्यात तुरळक पाऊस
By admin | Published: June 08, 2015 1:32 AM