अकोला : कोरोनाच्या काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनपासून रामदासपेठ पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी वादात सापडत आहेत. अशाच एका पोलिसाने एका युवकास बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी घडली. दरम्यान, युवकाने या प्रकरणाची तक्रार पोलीस ठाण्यात करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत या युवकाची तक्रार घेतली नव्हती.शहरातील रामदासपेठ पोलीस स्टेशनमधील एका वादग्रस्त पोलीस कर्मचाऱ्याने दुचाकी घेऊन आलेल्या एका युवकास मारहाण केली. मारहाण करणारा पोलीस कर्मचारी साप्ताहिक सुटीवर असतानादेखील त्याने मारहाण केल्यानंतर ठाण्यात हजर राहून सदर युवकाविरुद्ध साना नोंद केला. त्यापूर्वीच मारहाणीत जखमी असलेल्या युवकाने रामदासपेठ पोलिसांकडे सदर पोलीस कर्मचाºयाची तक्रार केली असता पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. ठाणेदार मुकुंद ठाकरे हे पोलीस ठाण्यात आले तरच तक्रार घेऊ अन्यथा तक्रार घेणार नसल्याची भूमिक येथील पोलिसांनी घेतल्याचा आरोप जखमी युवकाने केला आहे. या पोलीस ठाण्यातील एका कर्मचाºयाने एका महिलेला अशाच प्रकारे मारहाण केली होती. त्यानंतर युवकास मारहाण करणाºया पोलीस कर्मचाºयाने यापूर्वीदेखील लॉकडाऊनमध्ये निरपराध नागरिकांना बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने तक्रार घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी युवकाने केली आहे. या संदर्भात रामदासपेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार मुकुंद ठाकरे यांच्याशी भ्रमनध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही, दरम्यान या प्रकाराबाबत रविवारी रात्री उशिरा वंचित बहुजन आघाडीने गृहमंत्र्यांकडे ईमेलद्वारे तक्रार केल्याची माहिती प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी दिली.
रुग्णांच्या नातेवाइकांना ठेवले होते बसूनधारणी तालुक्यातील तुकईथड येथील विशाल दुबे आणि विरू मिश्रा यांच्या नातेवाइकांचे औषध घेण्यासाठी अकोट स्टॅन्डवरून येत असताना रामदासपेठ पोलिसांनी या दोघांनाही पकडून पोलीस ठाण्यात बसून ठेवले होते. या दोघांचे नातेवाईक असलेल्या त्यांच्या मामाचे डायलिसिस करण्यासाठी औषध गरजेचे असल्याने ते औषध घेण्यासाठीच हे युवक अकोल्यात आले होते; मात्र पोलिसांनी त्यांचे काहीही म्हणणे ऐकून न घेता त्यांना ठाण्यात बसून ठेवले होते. या दोघांनी औषधांच्या चिठ्ठ्या पोलिसांना दाखविल्यानंतरही रामदासपेठ पोलिसांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नव्हते.