अकोला: जनसामान्यांना पर्यावरणाचे महत्व कळावे ,जनतेनी सायकलचा आपल्या दिनचर्येत उपयोग करावा यासाठी जीवनप्रेरक मनीष सेठी यांच्या संकल्पनेतून अकोला ते रामटेक सायकल यात्रा काढण्यात आली. ह्यूमॅनिटी सायकल समूह व सकल जैन समाजाच्या वतीने आयोजित या सायकल रैलीत जीवन प्रेरक मनीष सेठी, अरविंद आगरकर अमोल हनुमंते,राहुल आगरकर ,संजय वाडेवाले आदी सायकलस्वार सहभागी झाले होते. सायकलला पर्यावरण वाचावा चा फलक लावून गावोगावी जनजागरण करीत या सायकलवीरांनी अकोला ते रामटेक हे तीनशे तीन किमी चे अंतर तीन दिवसात मजल दरमजल करीत पूर्ण केले. बोरगाव मंजू , मूर्तिजापूर, बडनेरा, अमरावती, नांदगाव खंडेश्वर, कारंजा घाडगे, बाजारगाव, नागपूर आदी गावात सकल जैन समाजाच्या वतीने या सायकल रॅलीचे स्वागत करण्यात येऊन त्यांचा शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. गावागावात जीवनप्रेरक, मॅनेजमेंट गुरु म्हणून ख्याती असणारे व पन्नास हजार झाडे लावण्याचा संकल्प केलेले मनीष सेठी यांनी पर्यावरणाचे महत्व सांगून पर्यावरण व शरीर स्वास्थासाठी सायकलचा उपयोग करण्याचे आवाहन केले. ठिकठिकाणी पर्यावरणाचे महत्व सांगणारी भित्तीपत्रके नागरिकांना वितरित करण्यात आली. रामटेक येथे आचार्य विद्यासागर महाराज यांचा या सायकलस्वारांना विशेष आशीर्वाद प्राप्त होऊन त्यांनी यांचे कौतुक केले.
पर्यावरण जनजागृतीसाठी अकोला ते रामटेक सायकल यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 1:40 PM
अकोला: जनसामान्यांना पर्यावरणाचे महत्व कळावे ,जनतेनी सायकलचा आपल्या दिनचर्येत उपयोग करावा यासाठी जीवनप्रेरक मनीष सेठी यांच्या संकल्पनेतून अकोला ते रामटेक सायकल यात्रा काढण्यात आली.
ठळक मुद्देह्यूमॅनिटी सायकल समूह व सकल जैन समाजाचा उपक्रम तीन दिवसांत केला ३०० किमी प्रवास