मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी शासनस्तरावर विविध उपक्रम राबविले जात आहेत. मुलींच्या जन्मदराविषयी आवश्यक सर्वच नोंदी दरवर्षी आरोग्य मंत्रालयामार्फत केल्या जातात. याच संदर्भात केंद्र शासनाच्या आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीच्या एका अहवालानुसार, २०१८-१९ च्या तुलनेत राज्यातील मुलींच्या जन्मदरात सुधारणा झाल्याचे दिसून आले. राष्ट्रीय पातळीवर विचार केल्यास २०१८-१९ च्या तुलनेत २०१९-२० या वर्षभरात फारशी सुधारणा झाल्याचे दिसून येत नाही, मात्र राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुलींच्या जन्मदरात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. राज्यात मुलींच्या जन्मदरात सर्वाधिक वृद्धी हिंगोली जिल्ह्यात झाली. २०१८-१९ मध्ये जिल्ह्यात एक हजार मुलांमागे ९०१ मुलींचा जन्म झाला होता, २०१९-२० या वर्षभरात मुलींचा जन्मदर ४७ ने वाढून तो हजार मुलांमागे ९४८ असा झाला. राज्यात दुसऱ्या स्थानी सोलापूर जिल्हा असून, तिसऱ्या स्थानी अकोला जिल्ह्याचा क्रमांक लागतो. अकोल्यात २०१८-१९ मध्ये एक हजार मुलांमागे ९२४ मुली जन्मल्या होत्या. २०१९-२० वर्षात ३२...... ने वाढ होऊन मुलींचा जन्मदर ९२८............. वर पोहोचला.
अशी आहे राज्याची स्थिती
जिल्हा - २०१८-१९ - २०१९-२० - मुलींच्या जन्मदरात झालेली वाढ
हिंगोली - ९०१ - ९४८ - ४७
सोलापूर - ८९३ - ९२८ - ३५
अकोला - ९२४ - ९५६ - ३२
उस्मानाबाद - ९०२ - ९२८ - २६
अमरावती - ९२६ - ९५२ - २६
धुळे - ९०३ - ९२८ - २५
यवतमाळ - ९५४ - ९७८ - २४
नाशिक - ९१४ - ९३४ - २०
ठाणे - ९६० - ९७९ - १९
लातूर - ९२२ - ९३८ - १६