अकोला : जिल्ह्यात बुधवारी रात्री अतिवृष्टी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. या पावसामुळे नदी, नाल्यांना मोठा पूर आला होता. या दिवशी देशात सर्वाधिक पाऊस हा अकोला जिल्ह्यात झाल्याची नोंद असून जिल्ह्यात १८४.८ मिमी पाऊस झाला होता.गत काही दिवसांपासून जिल्ह्यात तूरळक ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरू आहे. त्यामुळे रखडलेल्या पेरण्या आटोपल्या असून सुरुवातील पेरणी झालेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. जिल्ह्यात दररोज पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे पिकेही चांगली बहरली होती; परंतु बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे सर्व काही उद्धवस्त झाले. रात्रभर धोधो बरसलेल्या पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला. त्यामुळे जिल्ह्यात ३४ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. हा पाऊस देशात सर्वाधिक असल्याची नोंद झाली आहे. तर अकोला शहरातही २०२ मिमी पाऊस झाला होता.
देशातून अकोल्यात सर्वाधिक पावसाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 11:18 AM