शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

ठाणेदाराच्या बदलीनंतर शिवसेनेचे आंदोलन मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2020 11:22 AM

Shivsena Agitation, Gopikishan Bajoriya प्रकाश पवार यांची बदली करण्यात आल्यानंतर शिवसेनेने आंदोलन मागे घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यातील युवतीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पुतळा जाळताना वाहतुकीची कोंडी झाल्याच्या मुद्यावरून शनिवारी शिवसेनेच्या जिल्ह्यातील दोन्ही आमदारांची पोलिसांसोबत चांगलीच जुंपली. अखेर ठाणेदार प्रकाश पवार यांची पोलिस मुख्यालात बदली करण्यात आल्यानंतर शिवसेनेने आंदोलन मागे घेतले.जुने शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रकाश पवार यांनी लोकप्रतिनिधींशी गैरवर्तन केल्याचा आरोप करीत, शिवसेनेने दिवसभर जय हिंद चौकात ठिय्या आंदोलन केले. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी स्वत: घटनास्थळी जाऊन आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला; मात्र ते पवार यांच्या निलंबनाच्या मागणीवर ठाम होते. अखेर पोलीस अधीक्षक श्रीधर यांनी सायंकाळी पवार यांची पोलीस मुख्यालयात बदली केल्यानंतर शिवसेनेने आंदोलन मागे घेतले.शिवसेनेचे आंदोलन शांततेत पार पडल्यानंतर अचानक ठाणेदार प्रकाश पवार यांनी सेनेचे ज्येष्ठ आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यासोबत वाद घातला. आंदोलनामध्ये सामील महिला पदाधिकाऱ्यांसोबत पोलिसांनी असभ्य वर्तन केले. त्यामुळे प्रकाश पवार यांच्यावर कारवाईची मागणी केली होती.- नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख तथा आमदारआम्ही ठाणेदार प्रकाश पवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांची विभागीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. पोलीस प्रशासनाने योग्य कारवाई न केल्यास हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा रेटून धरल्या जाईल.- गोपीकिशन बाजोरिया,विधान परिषद सदस्य, शिवसेनायाप्रकरणी शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींची तक्रार प्राप्त झाली असून, ठाणेदार प्रकाश पवार यांची पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.- जी. श्रीधर,जिल्हा पोलीस अधीक्षक

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAkolaअकोला