अकोला, दि. २८: कुस्ती, कबड्डी आणि फुटबॉल खेळामुळे देशात क्रीडाक्षेत्रात ओळख निर्माण केली होती. मात्र, अलीकडे बॉक्सिंगमुळे अकोला जिल्ह्याची ओळख बदलून 'मिनी भिवानी' झाली आहे. अकोला जिल्ह्यात खेळाकरिता पोषक वातावरण असून, पुरेशा सुविधा उपलब्ध आहेत. अकोला जिल्हा ऑनलाइन होणारा महाराष्ट्रातील दुसरा जिल्हा आहे. यंदा शालेय स्पर्धांंकरिता प्रवेश मिळविण्यासाठी ऑनलाइन नोंदणीने प्रारंभ करण्यात आला.अकोला जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने वसंत देसाई क्रीडांगण येथे कबड्डी, खो-खो, बॉक्सिंग, कुस्ती, व्हॉलीबॉल प्रशिक्षण केंद्र चालविण्यात येते. या पाचही खेळाकरिता शासनाच्यावतीने प्रशिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. उच्चदर्जाचे प्रशिक्षण खेळाडूंना मिळावे, याकरिता राज्य क्रीडा मार्गदर्शकांची नियुक्ती शासनाने केली आहे. तसेच हॅण्डबॉल, बॅडमिंटन, जिम्नॅस्टिक, वेटलिफ्टिंग, बास्केटबॉलचे प्रशिक्षण केंद्र असून, हे प्रशिक्षण केंद्र करारपद्धतीने खासगी संस्था व स्पोटर्स असोसिएशनला देण्यात आलेले आहे. तरणतलावाची सुविधादेखील आहे. जिल्हा क्रीडा संकुल समिती अंतर्गत दोन भव्य जिल्हा क्रीडा संकुल असणारे अकोला पहिला जिल्हा आहे. यावर्षी दिवेकर क्रीडा संकुल जिल्हा क्रीडा संकुलच्या देखरेखीत चालविण्यासाठी शासनाची मान्यता मिळाली आहे. दिवेकर क्रीडा संकुलमध्ये क्रीडा सुविधा निर्माण करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. मूर्तिजापूर तालुका क्रीडा संकुल मधील सभागृहाचे बांधकाम सुरू आहे. आकोट, तेल्हारा आणि बाश्रीटाकळी क्रीडा संकुलच्या कामासाठी १ कोटी ४0 लाख निधी शासनाकडून उपलब्ध झालेला आहे. बाळापूर आणि अकोला तालुका क्रीडा संकुलकरिता जागा निवड अंतिम टप्प्यात आहे. अकोला जिल्हा क्रीडा विभाग संपूर्ण ऑनलाइन होणारा विदर्भातील पहिला जिल्हा आहे. महाराष्ट्रातील दुसरा जिल्हा आहे. नाशिक जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे. यावर्षीपासून अकोल्यात शालेय क्रीडा स्पर्धांंची खेळाडू व संघाची नोंदणी ऑनलाइन करण्यात आली. ७३१ विद्यार्थ्यांंनी ऑनलाइन नोंदणी केली असून, ५00 शाळा ऑनलाइन जुळल्या गेल्या. वर्षभरात तालुका, जिल्हास्तरच्या एकूण २४६ क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत घेतल्या जातात. शासनाच्यावतीने चालविण्यात येणारी पहिली बॉक्सिंग अकादमी अकोल्यात निर्माण होत आहे. बॉक्सिंग एक्सलेन्सी सेंटर इमारतीचे काम प्रगतीपथावर सुरू असून, याचवर्षी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या अकादमीचे भूमिपूजन करण्यात आले होते. कुस्ती खेळाच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॅटस् तालुका प्रशिक्षण केंद्रामध्येदेखील क्रीडा कार्यालयाच्यावतीने उपलब्ध करू न देण्यात आल्या आहेत.
अकोला क्रीडा विभाग ऑनलाइन होणारा महाराष्ट्रातील दुसरा जिल्हा
By admin | Published: August 29, 2016 1:22 AM