शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
2
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
3
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
4
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
5
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
6
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
8
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
9
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
10
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
11
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
12
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
13
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
14
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
15
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
17
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
18
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
19
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
20
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!

अकोला: सौंदळा येथे युवा शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2018 6:13 PM

सौंदळा  (अकोला) : सततची नापीकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून सौंदळा येथील युवा शेतकऱ्याने ४ आॅगस्ट रोजी शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली.

ठळक मुद्देओमप्रकाश भटकर याने मे २०१८ मध्ये एक एकर शेत नवीन विकत घेतले. पेरणीसाठी आणि आर्थिक व्यवहार चालविण्यासाठी बँकेमार्फत कर्जही उचलले. कर्ज फिटणार नाही, या विवंचनेत उरलेली फवारणीची औषण सायंकाळच्या सुमारास प्राशन केले.

सौंदळा  (अकोला) : सततची नापीकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून सौंदळा येथील युवा शेतकऱ्याने ४ आॅगस्ट रोजी शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली. ओमप्रकाश रामभाऊ भटकर (४२) असे मृतक शेतकऱ्याचे आहे.ओमप्रकाश भटकर याने मे २०१८ मध्ये एक एकर शेत विकत घेतले. हे शेत पेरणीसाठी आणि आर्थिक व्यवहार चालविण्यासाठी बँकेमार्फत कर्जही उचलले. शेत पेरले तेव्हापासून निसर्गाची अवकृपा झाली. ४ आॅगस्टच्या सकाळी शेतात फवारणी केली. एक एकराच्या पिकात आर्थिक व्यवहार होणार नाहीत, कर्ज फिटणार नाही, या विवंचनेत उरलेली फवारणीची औषण सायंकाळच्या सुमारास प्राशन केले. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी ओमप्रकाशला तातडीने सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे दाखल केले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ओमप्रकाश हा जिल्हा परिषद शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष होता. त्याच्या मागे आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहिण असा आप्त परिवार आहे. (वार्ताहर)

टॅग्स :Akolaअकोलाfarmer suicideशेतकरी आत्महत्या