- राजेश शेगोकार
अकोला: ऑलिम्पिक विजेत्या खेळाडू विणेश फोगाट, साक्षी मलिक व सहकाऱ्यांनी स्वतः वर झालेल्या लैंगिक अत्याचाराविरोधात दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर गेल्या १५ दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाच्या समर्थनासाठी अकोलेकरांनी गांधी-जवाहर बागेतील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर काळ्या फिती बांधून धरणे आंदोलन केले.
महात्मा गांधींनी दाखविलेल्या शांततेच्या मार्गाने दिल्लीतील आंदोलनाला अकोल्यातून पाठिंबा देण्यात आला. सकाळी ९ वाजतापासून ११.३० वाजेपर्यंत धरणे देण्यात आले. त्याच ठिकाणी निवेदनाचे वाचन करण्यात आले. त्यानंतर अकोला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन धरणे आंदोलनाची सांगता करण्यात आली. यावेळी सहभागी आंदोलकांनी आपल्या दंडावर काळी फित बांधून आपला निषेध नोंदवला.
यावेळी जिल्ह्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर विजय कौसल, गजानन घोंगडे, शरद वानखडे, ऍड.सविता खोटरे, अशोकराव अमानकर, पुरुषोत्तम आवारे, विवेक पारसकर, प्रशांत गावंडे, विजय देशमुख कुटासकर, प्रा.सुभाष गादिया, अशोक घाटे, नरेंद्र चिमनकर, किशोर बळी, जोत्सना चोरे, सुषमा गोतरकर, राजश्री देशमुख, हेमलता वरोकार, सुषमा कावरे, सीमा वानखडे, प्रा.मधू जाधव, आनंद (पिंटू)वानखडे, पूजा सोनोने, अंबिका मोरे, रश्मी गावंडे, गौरी सरोदे, श्याम देशमुख, मयूर गोठकडे, प्रदीप चोरे, ऍड.अनिल लव्हाळे, मयूर जोशी, गजानन हरणे, अतुल अमाणकर, मयूर जोशी, शिवाजी भोसले, आर.पी. देशमुख, धम्मदीप इंगळे, मारोती वरोकार,, कोमल अकाळ, भूषण टाले, विकास जाधव, अंबिका मोरे, सार्थक राऊत, चंद्रकांत झटाले यांच्या सह्या आहेत.