- अतुल जयस्वाल
अकोला : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून, या मोहिमेत अकोला तालुका आघाडीवर आहे. शुक्रवार, २० ऑगस्टपर्यंतच्या आकडेवारीनुसार तेल्हारा तालुका मात्र लसीकरणात माघारल्याचे चित्र आहे. शहरी भागांमध्ये लसीकरणास नागरिकांचा चांगला प्रतिसाद असला, तरी ग्रामीण भागात उदासीनता दिसून येत आहे.
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेस सुरुवात झाली असून, आतापर्यंत जवळपास ५ लाख ८६ हजार नागरिकांनी लसीचा किमान एक डोस घेतला आहे. आरोग्य विभागाकडून कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लसीचे डोस देण्यात आहेत. कोरोना संसर्गाची लाट उच्च पातळीवर होती, तेव्हा लसीकरणास नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिला. गत काही दिवसांपासून कोरोनाची लाट ओसरल्यामुळे लसीकरणाची गतीही मंदावल्याचे चित्र आहे.
तालुकानिहाय असे झाले लसीकरण (नागरिक)
तालुका पहिला डोस दुसरा डोस
अकोला ३८,१६८ १३,६८८
अकोट २९,०१५ ९,४२८
बाळापूर २६,३९१ ७,२२३
मूर्तिजापूर २६,३८१ ७,५०८
पातूर २५,९४१ ७,२०२
बार्शीटाकळी २३,३९९ ७,१९१
तेल्हारा २२,४७० ९,०५९
अकोला महापालिका क्षेत्रात सर्वाधिक लसीकरण
लसीकरणास अकोला शहरातील नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत १ लाख ५४ हजार नागरिकांनी लसीचा एक डोस घेतला आहे. ७८,८७५ नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत.
तालुक्याच्या शहरांमध्येही समाधानकारक स्थिती
जिल्ह्यातील सातही तालुक्यांच्या शहरांमध्ये लसीकरणाची स्थिती समाधानकारक आहे. सातही शहरांमध्ये आतापर्यंत ६९,०२७ नागरिकांनी लसीचा एक, तर ३१,४४३ नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.