लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सार्वजनिक बांधकाम विभागाने जारी केलेले नवीन शासकीय दर व निविदेतील क्लिष्ट शर्ती-अटींमुळे नऊ क ोटींच्या विकास कामांकडे महापालिकेतील कंत्राटदारांनी पाठ फिरवली आहे. सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना व दलितेतर योजनेच्या कामासाठी निविदा अर्ज सादर करण्याचा बुधवार अखेरचा दिवस होता. प्रशासनाने निविदेतील जाचक अटी रद्द करेपर्यंत निविदा अर्ज सादर न करण्याची भूमिका मनपातील कंत्राटदार असोसिएशनने घेतली आहे. सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना, दलितेतर योजनेंतर्गत महापालिक ा क्षेत्रात नऊ कोटी रुपयांतून विकास कामे केली जाणार आहेत. यामध्ये सिमेंट रस्ते, नाल्या, धापे, सामाजिक सभागृह तसेच इतर कामे प्रस्तावित आहेत. नऊ कोटींच्या कामासाठी मनपा प्रशासनाने ई-निविदा प्रकाशित केल्या असता निविदेतील अटी व शर्ती पाहून कंत्राटदारांनी विकास कामांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा सार्वजनिक बांधकाम विभागाने जारी केलेल्या शासकीय दरात (सीएसआर) वाढ होण्याचा कंत्राटदारांना अंदाज होता. तसे न होता, त्यामध्ये मोठय़ा प्रमाणात घसरण झाल्याचे समोर आले आहे. यापूर्वी ‘सीएसआर’नुसार प्रति ब्रासचे दर ५ हजार ५२0 रुपये होते. नवीन ‘सीएसआर’नुसार ते ३ हजार ७५0 झाल्याची माहिती आहे. जीएसटी लागू झाल्यामुळे कंत्राटदारांना १८ टक्के कर जमा करावा लागणार आहे. अशास्थितीत ‘सीएसआर’चे दर कमी झाल्यामुळे काम करणे शक्यच नसल्याची भूमिका कंत्राटदारांनी घेतली आहे. मनपा प्रशासनाने जारी केलेल्या निविदेत सिमेंट रस्त्यांसाठी रेडी मिक्स प्लान्टची अट नमूद करण्यात आली आहे. ही अट कंत्राटदारांना अडचणीची आहे. ५0 लाखांच्या आतील सर्व रस्त्यांच्या व विकास कामांच्या निविदेतून रेडी मिक्स प्लान्टची अट रद्द करण्याची कंत्राटदारांची मागणी आहे. निविदेतील जाचक अटींसह कंत्राटदारांनी केलेल्या मागण्यांची प्रशासनाने पूर्तता करावी, तोपर्यंत नऊ कोटींच्या विकास कामांच्या निविदा सादर न करण्याचा निर्णय कंत्राटदार असोसिएशनच्यावतीने अध्यक्ष हरीश मिरजामले, सचिव सुधीर काहाकर, मो.तय्यब, दीपक पांडे, संदीप गोखले, नीलेश वर्हाडे, गोपाल गाढे, रिषी खांडपूरकर, वहिद खान, इम्तियाज कासमानी, प्रणय बासोळे, सतीश मदनकार, शोहब राजा, अमोल पेंटेवार, किरण परभणीकर, सचिन वाघमारे, मुक्तीनारायण पांडे, अ. वहिद यांनी घेतला आहे.
प्रशासनासमोर पेचमनपा प्रशासनाने सुवर्ण जयंती नगरोत्थान व दलितेतर योजनेंतर्गत एकूण नऊ कोटींतून होणार्या विकास कामांच्या निविदा प्रकाशित केल्या. बुधवारी निविदा अर्ज सादर करण्याचा अखेरचा दिवस होता. कंत्राटदारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. यातून प्रशासन कसा तोडगा काढणार, याकडे लक्ष लागले आहे.
निविदेतील अटीसंदर्भात कंत्राटदारांच्या काही अडचणी असतील तर त्यावर तोडगा काढला जाईल. त्यासाठी बांधकाम विभागातील अधिकार्यांसोबत चर्चा क रू. -जितेंद्र वाघ, आयुक्त, मनपा