लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मराठा नगरातील रामधन प्लॉट येथील रहिवासी आजीने घरात ठेवलेले सोने आणि चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम नातवानेच लंपास केल्याची घटना घडल्यानंतर, रामदास पेठ पोलिसांनी नातवाकडून बुधवारी तब्बल ४ लाख ५0 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी नातवास न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीची कारागृहात रवानगी केली. रामधन प्लॉटमध्ये इंदिरा बापुराव कसुरकार यांचे संयुक्त कुटुंब रहिवासी आहे. ३0 डिसेंबर रोजी घरातून २४0 ग्रॅम सोन्याचे दागिने, एक किलो चांदी व ९0 हजार रुपये चोरीला गेल्याची घटना घडली होती. मात्र, घरात चोरट्यांनी तोडफोड न करता तसेच बाहेरील व्यक्ती घरात घुसलाच नसल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले होते. पहिल्या दिवसापासूनच पोलिसांना या चोरी प्रकरणात घरातीलच कुणीतरी सहभागी असल्याचा संशय होता. त्यानुसार शुक्रवारी संध्याकाळी रात्री इंदिरा कसुरकार यांनी रामदास पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी तक्रारीत म्हटले, की घरातून २४ तोळे सोने व एक किलो चांदी, तसेच ९0 हजार रुपये चोरी गेले आहेत. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी घरातील प्रत्येक सदस्याची कसून चौकशी केली. दरम्यान, त्यांचा संशय मुलीचा मुलगा सौरभ जगदीश ढोरे याच्यावर गेला. त्यानुसार त्यांनी चौकशी केली असता, त्याने चोरीची कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांनी इंदिरा कसुरकार यांचा नातू सौरभला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल क ेला. न्यायालयाने आरोपी सौरभ याला १७ जानेवारीपयर्ंत पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीदरम्यान त्याने तब्बल साडेचार लाख रुपयांचे दागिने पोलिसांना दिले असून, पोलिसांनी ते जप्त केले आहेत.
महसूल अधिकार्याचा पुत्रही अडकणार!एका महसूल अधिकार्याचा पुत्रही या चोरीमध्ये त्याचा साथीदार असल्याचे समोर आले आहे. मात्र, त्याने नेमके कशासाठी सहकार्य केले, हा तपास पोलीस क रीत आहेत. महसूल अधिकार्याच्या पुत्राचा या चोरीत सहभाग असल्याचे जवळपास निश्चित असून, त्याच्यावरही फौजदारी कारवाई होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी नातवाकडून साडेचार लाख रुपयांचे दागिने जप्त केले. घरातील पळविलेले दागिने व रोख एवढीच असल्याचे त्याचे म्हणणे आहे. यावरून तक्रारकर्त्यांनी आकडा फुगविल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, त्यानंतरही त्यांनी सौरभ ढोरे याची कसून चौकशी सुरू केली आहे.