लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मध्यवर्ती बसस्थानकावर असलेल्या टिकीट बुकिंग सेंटरमधील महिलेला चकवा देत अज्ञात चोरट्यांनी या बुकिंग सेंटरमधून तब्बल २५ हजार रुपयांची रोकड पळविल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.मध्यवर्ती बसस्थानकावरील टिकीट बुकिंग सेंटरमध्ये महिला कर्मचारी कार्यरत असताना एक अज्ञात चोरटा बुकिंग सेंटरच्या आतमध्ये घुसला. त्याने महिला कर्मचार्यास तुमचे पैसे खाली पडलेले असल्याचे सांगितले, महिला १0 रुपयांच्या नोटा उचलण्यासाठी खाली झुकल्या असता, अज्ञात चोरट्याने बुकिंग सेंटरच्या ड्राव्हरमध्ये असलेली २५ हजार रुपयांची रोकड घेऊन पळ काढला. महिला कर्मचार्यास काही कळायचा आतच चोरटा पसार झाला. त्यानंतर महिलेने या प्रकरणाची तक्रार सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात केली. बसस्थानकावर गर्दीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे चोरट्यांची हिंमत वाढल्याचे दिसुन येत आहे.
अकोला : मध्यवर्ती बसस्थानकावर तिकीट बुकिंग सेंटरमधून रोख पळविली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 2:12 AM
अकोला : मध्यवर्ती बसस्थानकावर असलेल्या टिकीट बुकिंग सेंटरमधील महिलेला चकवा देत अज्ञात चोरट्यांनी या बुकिंग सेंटरमधून तब्बल २५ हजार रुपयांची रोकड पळविल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
ठळक मुद्देबुकिंग सेंटरमधील महिलेला चकवा देत २५ हजार रुपयांची रोकड पळविल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली