शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
2
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
3
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
4
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
5
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
6
व्होट जिहादच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं; किरीट सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
7
देवेंद्र जी, आप भी चुनाव लड रहे है... मोदींनी नाव घेताच देवेंद्र फडणवीस धावत आले, धुळ्यातील सभेत काय घडलं?
8
SA vs IND : ऋतुराज गायकवाडला पुन्हा का वगळलं? भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचं मोठं विधान
9
ट्रम्प यांची एक घोषणा आणि Waaree Energies Shares आपटले; २ दिवसांत १०% ची घसरण
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
11
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
12
Wipro ला मिळाल्या २ ब्लॉक डील्स; ८.५ कोटी शेअर्सचं ट्रान्झॅक्शन; शेअर्सवर काय परिमाम होणार?
13
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
14
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...
15
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
16
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
17
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
18
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
19
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
20
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."

अमरावती विभागात यंदाही अकोला अव्वल

By admin | Published: October 03, 2016 2:27 AM

२२६.८२ कोटींचे विक्रीकर वसुलीचे लक्ष्य गाठणार असल्याचा विक्रीकर उपायुक्त सुरेश शेंडगे यांचा विश्‍वास.

संजय खांडेकर अकोला, दि. 0२- अमरावती विक्रीकर विभागाने २0१६-१७ च्या आर्थिक वर्षासाठी ७२३.४५ कोटींचे लक्ष्य ठेवले आहे. सुरुवातीपासून अमरावती विभागात अकोला कर विभागात कायम अव्वल राहिला आहे. यंदाही तो नेहमीप्रमाणे पुढेच राहील. अकोल्याने यंदा २२६.८२ चे लक्ष्य ठेवले असून, सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंंंत ११४ चा महसूल गोळा केला आहे. मासिक कर वसुलीच्या तुलनेत सप्टेंबरपर्यंंंत १0९.७५ कोटींचे उद्दिष्ट ठेवले होते. ठेवलेल्या उद्दिष्टानुसार पाच कोटींनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे २२६.८२ कोटींचे लक्ष्य कालावधीच्या आत पूर्ण होईल, असा विश्‍वास अकोला विक्रीकर विभागाचे उपायुक्त सुरेश शेंडगे यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना व्यक्त केला. व्यापारी कर बुडवू शकणार नाही!शासनाच्या धोरणांतर्गत विभाग डिजिटल झाल्यामुळे आता कुणीही व्यापारी कर बुडवू शकणार नाही. डिजिटलायझेशनमुळे विभाग आता गल्लीबोळात पोहोचणार आहे. जे कर भरत नाहीत, त्यांची माहिती गुमास्ता विभाग, आयकर विभाग आणि पीपीएफकडून मागवित आहे.व्यापा-यांच्या हितासाठी कॉल सेंटरव्यापार्‍यांना व्हॅटची सर्वांंंगीण माहिती देण्यासाठी राज्याचे कॉल सेंटर नागपुरात स्थापन करण्यात आले आहे. या सेंटरनंतर अमरावती विभागाचे काम चालते. अकोला, वाशिम, खामगाव व यवतमाळ येथील महसूल अमरावतीकडे गोळा होतो. अमरावतीचे विक्रीकर सहआयुक्त म्हणून सध्या सतीश लोहार नेतृत्व करीत आहेत. कर कोणी आणि के व्हा भरायचा, त्याची माहिती व आठवण व्यापार्‍यांना केंद्रातील कर्मचारी मोबाइलवर करून देत असतात.व्यावसायिकांना जोडण्यासाठी विभागाचा उपक्रमराज्यात व्यवसाय कर (प्रोफेशनल टॅक्स) कायदा १ एप्रिलपासून अमलात आला. राज्यात व्यवसाय करणारे वकील, नोटरी, वैद्यकीय अधिकारी, व्यावसायिक, ऑर्किटे क्ट, इंजिनिअर्स, कर सल्लागार, सीए, कमिशन एजंट, दलाल, ब्रोकर, कंत्राटदार, केबल ऑपरेटर, लग्न समारंभ चालविणारे संचालक-मालक, ब्युटी पार्लर, हेल्थ सेंटर्स, कोचिंग क्लासेस चालविणारी व्यक्ती, हॉटेल, सिनेमागृहाचे मालक, मनीलेंडर्स, चिटफंड चालविणार्‍या संस्था, बँकिंग व्यवहार करणार्‍या संस्था, सहकारी संस्था, कंपन्या, भागीदारी संस्थांचे भागीदार यांना सर्वांंंंना व्यवसाय कर भरणे बंधनकारक आहे.कार्यालयात यायची गरज नाही!विभाग डिजिटल झाल्यामुळे व्यापारी अथवा कर सल्लागारांना विक्रीकर विभागात येण्याची गरजच नाही. त्यांना विवरण, पेमेंट व परतावा आदी ऑनलॉइन भरता येणार आहे. जीएसटीसाठी विभाग सज्जदेशभरात जीएसटी १ एप्रिल १७ पासून लागू होणार आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून विभागातील करविषयक सर्व दावे सामोपचाराने निकाली काढून कर संग्रहण करण्यात येत आहे. विभागाचे अधिकारी व्यापारी आणि व्यावसायिकांपर्यंंंत पोहोचत आहे. जुनी करवसुली कमी करण्यात विभाग प्रयत्नरत आहे.जीएसटीचे प्रशिक्षणजीएसटी लागू झाल्यानंतर काय करावे, यासाठी अधिकार्‍यांना विभागातर्फे प्रशिक्षण देण्यात येत आहे. व्यापारी संघटना, कर सल्लागारांनाही प्रशिक्षणात सामावून घेण्यात येत आहे. प्रत्येक जिल्हय़ात प्रशिक्षण शिबिर घेण्यात येत आहे. त्यासाठी अकोल्यातही तयारी सुरू आहे.अमरावती विभागात अकोला अव्वलठिकाण             २0१५-१६               २0१६-१७                         (रु.कोटीत)अमरावती            १५७.१७                  १८९.९८अकोला               १८७.६५                  २२६.८२खामगाव                ८६.९७                 १0५.१३यवतमाळ              १३0.९                  १५८.२३वाशिम                   ३५.८२                   ४३.३0