अकोला : महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या निर्देशानुसार शैक्षणिक सत्र २०१८-१९ साठी अकोला जिल्ह्यातील १८४१ शाळांपैकी १८१५ शाळांनी स्वयंमूल्यमापन केले असून, राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. अकोला पाठोपाठ राज्यात सातारा, गोंदिया जिल्ह्यात शाळा वेगाने स्वयंमूल्यमापन करीत आहेत.शाळा सिद्धी अंतर्गत सर्वाधिक सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी आपले मूल्यांकन व प्रमाणीकरण करणे तसेच शाळांची गुणवत्ता आश्वासित करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने देशभरात शाळा सिद्धी तर महाराष्ट्रात समृद्ध शाळा नावाने शाळांना स्वयंमूल्यमापन करणे अनिवार्य आहे. जिल्ह्यात यासंदर्भात प्रारंभी शाळांची उदासीनता होती; पण सद्यस्थितीत जिल्ह्यातील एक हजार ८४१ शाळांपैकी एक हजार ८१५ शाळांचे स्वयंमूल्यमापन झाले असून, शाळा सिद्धीचे लक्ष पूर्णत्वाकडे जात आहे.पहिले तीन जिल्हेजिल्हा - स्वयंमूल्यमापन (टक्क्यांमध्ये)अकोला - ९८.५८सातारा - ९८.५५गोंदिया - ९७.२७शाळा सिद्धी अंतर्गत जिल्ह्यातील शाळा वेगाने स्वयंमूल्यमापन करीत असून, हे कार्य पूर्णत्वास जात आहे. राज्यात अकोला जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे.- प्रशांत शेवतकर, शाळासिद्धी, राज्य प्रशिक्षक सुलभक व निर्धारक.