लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: मुख्यमंत्र्यांचा ७ जून रोजीचा प्रस्तावित अकोला दौरा स्थगित करण्यात आल्याची माहिती सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालर्याला प्राप्त झाली. त्यामुळे मुख्यमंत्री दौऱ्याच्या पृष्ठभूमीवर सुरू करण्यात आलेली पूर्वतयारी जिल्हा प्रशासनामार्फत थांबविण्यात आली.७ जून रोजी मुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावित अकोला दौऱ्याची पूर्वतयारी जिल्हा प्रशासनामार्फत सुरू करण्यात आली होती. त्यामध्ये ४ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत पूर्वतयारी कामाचा आढावादेखील घेण्यात आला होता; मात्र मुख्यमंत्र्यांचा प्रस्तावित अकोला दौरा स्थगित करण्यात आल्याची सूचना शासनामार्फत सोमवार, ५ जून रोजी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाला दूरध्वनीद्वारे प्राप्त झाली. आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांचा अकोला दौरा स्थगित!
By admin | Published: June 06, 2017 12:58 AM