शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य राजकारणात आले, त्याचा जास्त आनंद राज ठाकरेंना झाला”; मनसे नेत्यांनी सांगितली आठवण
2
"लढायचे नाही म्हणाले त्यांनाच उमेदवारी"; भांडूपमध्ये करेक्ट कार्यक्रम झाल्यानंतर मनसे नेत्याचा राजीनामा
3
Ratnagiri Assembly Elections 2024: मशाल पेटणार की, पुन्हा धनुष्यबाण! रत्नागिरीत गणित कसं?
4
आम्ही पवारांना अधिकार दिले, शेकाप सांगोल्याची जागा लढवणार नसेल तर...; जयंत पाटलांची रोखठोक भूमिका!
5
संजय राऊत यांनी आमच्या मतदारसंघाचे तिकीट विकले; पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप 
6
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणातील आरोपीचं झिशान अख्तरशी कनेक्शन; कुटुंबीय म्हणतात...
7
Airtel ची कमाल, 'या' ३ प्लॅन्ससोबत देतेय ५ लाखांपर्यंतचा फ्री इन्शुरन्स; पाहा डिटेल्स
8
"या राज्यात एका जातीच्या बळावर...!", मनोज जरांगे यांचं मोठं विधान; असं जुळवणार राजकीय समीकरण
9
R Ashwin ची टॉप क्लास कामगिरी! नावे झाला WTC च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्सचा रेकॉर्ड
10
Kalyan: भाजप उमेदवार सुलभा गायकवाड यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
11
दिवाळीत बँका किती दिवस बंद असणार? उसळलीय मोठी गर्दी, शेड्यूल बघून घ्या...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माजी खासदारांचा माज जनता उतरवणार', रोहित पाटलांचा अर्ज दाखल करण्यापूर्वी विशाल पाटीलांनी संजयकाकांना डिवचलं
13
ठाकरे की शिंदे कोण वरचढ ठरणार? २६ मतदारसंघात थेट लढत; उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर!
14
सपाच्या बालेकिल्ल्यात घमासान, अखिलेश यादवांच्या भाओजींनाच भाजपानं दिली उमेदवारी
15
Dhan Teras 2024: धनत्रयोदशी धन्वंतरीच्या पूजेचा दिवस; मग सोने चांदी खरेदीची प्रथा केव्हापासून?
16
Salman Khan : "तो खूप घाबरला होता, आम्ही बिस्किट खायला दिलं अन्..."; सलमानने सांगितला किस्सा
17
"एखाद्या ट्रकखाली येऊन माझा मृत्यू झाला तर...", वैतागलेल्या अभिनेत्याने सांगितली घोडबंदर रस्त्याची भयानक परिस्थिती
18
INDW vs NZW : पहिल्याच सामन्यातून भारतीय कर्णधार बाहेर; स्मृतीकडे नेतृत्व, २ खेळाडूंचे पदार्पण
19
ऑटो इंडस्ट्र्रीतील मोठ्या डीलची तयारी! महिंद्रा १ अब्ज डॉलर मोजून ५० टक्के हिस्सा खरेदी करणार, 'ही' कंपनी तयार?
20
३५ ऐवजी २० गुण मिळाले तरी व्हाल पास; दहावीच्या गणित, विज्ञानासाठी पुढील वर्षी नवीन नियम

Akola: दोन दुचाकींची धडक; तीन जणांचा जागीच मृत्यू, दोन गंभीर 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 8:45 PM

Akola News: तेल्हारा-हिवरखेड रस्त्यावर बेलखेड येथे दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एकाच कुटुंबातील वडील व दोन मुलींचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रविवार, दि. १९ मे रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. जखमींना उपाचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले.

- प्रशांत विखेतेल्हारा (जि. अकोला) - तेल्हारा-हिवरखेड रस्त्यावर बेलखेड येथे दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एकाच कुटुंबातील वडील व दोन मुलींचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रविवार, दि. १९ मे रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. जखमींना उपाचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले.

पंचगव्हाण येथील आसीक खान कुदरत खान(४५) हे दुचाकीने पत्नी सुमय्या आशिक खान (३५), मुलगी बुशराह आसीक खान (वय ३), मुलगी अम्मारा आसीक खान (वय ५) आणि मुलगी मरियम आसीक खान (वय ४ महिने) यांना घेऊन तळेगाव बाजार येथून तेल्हाराकडे येत होते. त्याचवेळी आकाश निंबोकार (रा. हिवरखेड, वय ४०) हा तेल्हारा येथून हिवरखेड येथे जात होता. बेलखेडजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. यामध्ये आसीक खान यांच्यासह त्याच्या दोन मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर चार महिन्यांची मरियम आशिक खान हिला कुठलीही दुखापत झाली नाही. ती सुरक्षित आहे. या घटनेत दोघे गंभीर जखमी झाले आहे. बेलखेड येथील नागरिकांनी व प्रत्यक्षदर्शी यांनी तेल्हारा पोलिस स्टेशनला माहिती देऊन रुग्णवाहिकेला पाचारण केले व जखमींना ग्रामीण रुग्णालय तेल्हारा येथे दाखल केले. या ठिकाणी तिघांना मृत घोषित केल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या सुमय्या आशिक खान, आकाश निंबोकार यांना अकोला येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. एकाच कुटुंबातील वडील व दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघात