- आशिष गावंडे
अकोला: शहरात २०१३-१४ या कालावधीत उभारलेल्या १८६ इमारतींवर अनधिकृत बांधकामाचा शिक्का मस्तकी लागण्यासाठी बांधकाम व्यावसायीकांमधील अंतर्गत स्पर्धा, संघटना ताब्यात घेण्याची चढाओढ व नवख्या बांधकाम व्यावसायीकांची या व्यवसायातून हकालपट्टी करण्यासह असंख्य बाबी कारणीभूत ठरल्या आहेत. परिणामी, एखादी आठ ते दहा सदनिकांची (फ्लॅट)रहिवासी इमारत, एखाद दुसरे डुप्लेक्स उभारण्यासाठी बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करताना नवख्या बिल्डरांचे अक्षरश: दिवाळे निघाल्याची परिस्थिती समोर आली आहे. असे असले तरी मनपाचा नगररचना विभाग व झोन अधिकाऱ्यांना खिशात ठेवून काही विशिष्ट बिल्डरांची बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत, हे येथे उल्लेखनीय.महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या कालावधीत २०१३-१४ मध्ये शहरात उभारण्यात आलेल्या रहिवासी इमारती, कमर्शियल कॉम्प्लेक्स यांचे मोजमाप घेण्यात आले होते. त्यावेळी नगररचना विभागाने १८६ इमारतींचे मोजमाप क रून प्रशासनाकडे अहवाल सादर केला. वास्तविक पाहता त्यावेळी शहरात २३२ पेक्षा अधिक इमारतींचे बांधकाम सुरू होते. शहरात विकास कामांची बोंब असताना व ती निकाली काढण्याचे सोडून तत्कालीन आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या डोक्यात इमारतींच्या मोजमापाचे खूळ आले कसे, असा प्रश्न बांधकाम व्यावसायीकांमध्ये उपस्थित झाला होता. यादरम्यान, बांधकाम व्यावसायिकांच्या क्रे डाई या नामवंत संघटनेतील तत्कालीन पदाधिकाºयाची ही कृपादृष्टी असल्याची माहिती समोर आली. मुळात संघटनेची जबाबदारी स्वीकारत असताना संबंधित व्यक्तीचे बांधकाम क्षेत्रातील योगदान, शहरात उभारलेल्या किंवा सुरू असलेली बांधकामे आदींचे ढोबळ निकष तपासल्या जातात. याठिकाणी संघटनेच्या नावावर स्वत:ची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करणाºया तत्कालीन पदाधिकाºयाचे त्यावेळी शहरात कोठेही बांधकाम सुरू नव्हते, हे विशेष. संघटनेतील अंतर्गत राजकारणावर पकड निर्माण करण्यासह बांधकाम क्षेत्रात पाऊल टाकणाºया नवख्या बिल्डरांना अटकाव घालण्यासाठी के्रडाईच्या तत्कालीन पदाधिकाºयाने मनपा प्रशासनाला हाताशी धरून इमारतींचे मोजमाप करण्यास भाग पाडले आणि तेव्हापासून या शहरातील बांधकाम व्यवसायाला उतरती क ळा लागली, ती अद्यापही कायम आहे. त्यावेळी बांधकाम क्षेत्रात मोठ्या उमेदीने पाऊल टाकणाºया अनुनभवी बांधकाम व्यावसायिकांनी इमारती, डुप्लेक्स उभारण्यासाठी बँकांकडून कर्जाची उचल केली होती.