लोकमत न्यूज नेटवर्क
अकाेला : जिल्ह्यात कोरोनाची साखळी ताेडण्याकरिता लावण्यात आलेल्या कडक निर्बंधाचे फलीत दिसत असले तरी कोरोना रुग्णांचा पाॅझिटीव्हीटी रेट १० टक्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे रूग्णांची संख्या व उपलब्ध ऑक्सीजन बेड यांची स्थिती पाहता जिल्हाधिकारी यांनी कडक निर्बंधामधून दिलासा दिला आहे. १ जून पासून दूकानांची वेळ सकाळी ७ ते दाेन वाजेपर्यंत करण्यात आली आहे. यामध्ये अत्यावश्यक व बिगर अत्यावश्यक प्रतिष्ठांनाचा समावेश आहे. मात्र बिगर अत्यावश्यक दूकाने हे शनिवार रविवार पुर्णपणे बंद राहतील असे आदेशात नमुद केल आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी १ जूनच्या सकाळी सात वाजेपासून तर १५ जूनच्या रात्री १२ पर्यंत नव्याने आदेश निर्गमित केले आहेत.
काेराेनाच्या साखळीला ब्रेक लावण्यासाठी लागु केलेल्या या निर्बधामध्ये लग्न, तसेच इतर साेहळयांवरील बंधने कायमच ठेवण्यात आली आहेत. दुकानांना पुरवठा केल्या जाणारा वस्तूंच्या वाहतुकीवर निर्बंध नाहीत. मात्र, दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना विक्री करता येणार नाही. या नियमांचा भंग केल्यास दुकान कोरोना साथ जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत बंद ठेवण्यात येईल. तसेच दुपारी तीन वाजेनंतर कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक आणि वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे.
निर्बंधासह सुरु ठेवण्यात आलेल्या अत्यावश्यक/ बिगर अत्यावश्यक सेवा
१ सर्व प्रकारची जीवनावश्यक दुकाने/किराणा/औषधी दुकाने/स्वस्त धान्य दुकाने सकाळी सात ते दु. दोन
२ अकोला महानगरपालिका तसेच जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागातील बिगर अत्यावश्यक दुकाने सकाळी सात ते दु. दोन ( सोमवार ते शुक्रवार )
३ जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागातील बिगर अत्यावश्यक दुकाने शनिवार व रविवार पूर्णतः बंद
४ भाजीपाला व फळ विक्रीची दुकाने( द्वार वितरणासह) सकाळी सात ते दु. दोन
५ दुध व दुग्धजन्य पदार्थ विक्री (घरपोच दुधविक्री नियमित वेळेनुसार सुरु राहील.) ( स्विटमार्टची दुकाने वगळता) सकाळी सात ते दु. दोन , सायंकाळी पाच ते सात.
६ कृषी सेवा केन्द्र व कृषी निविष्ठांची दुकाने कृषी प्रक्रिया उद्योगगृहे \ शेती औजारे आणि शेतातील उत्पादनांशी संबंधित दुकाने. सकाळी सात ते दु. तीन
७ सर्व राष्ट्रीयकृत बँका , खाजगी बँका, बिगर बॅंकिंग वित्तीय संस्था, सुक्ष्म वित्त संस्था, सहकारी संस्था, पतपेढी संस्था, विमा,पोस्ट पेमेंट बॅंक व आर्थिक बाबींशी संबंधित असलेल्या सर्व वित्तिय संस्था. सकाळी दहा ते दु. तीन यावेळात सुरु राहतील.
८ पेट्रोलपंप/डीझेल/सीएनजी गॅस पंप सकाळी सात ते दु. दोन
त्यानंतर दुपारी दोन ते रात्री आठ या कालावधीत शासकीय/ मालवाहतूक, अॅम्ब्युलंन्स इ. अत्यावश्यक वाहनांकरिता शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील कामे तसेच मालाची वाहतूक करण्याकरीता शहनिशा करुन ट्रॅक्ट्रर घेवून येणाऱ्या शेतकऱ्यांना पेट्राेल
९ एमआयडीसी व राष्ट्रीय महामार्ग व हायवेवरील पेट्रोल/ डिझेल पंप नियमित वेळेनुसार
१० रेस्टॉरेन्ट , भोजनालय, उपहारगृह सकाळी सात ते रात्री आठ वा.पर्यंत फक्त होम डिलेव्हरी सेवा पुरविण्यास परवानगी
११ कृषी उत्पन्न बाजार समिती सकाळी सात ते दु. दोन
१२ शिवभोजन वेळेनुसार
१३ अकोला महानगरपालिका तसेच जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागातील CSC Centers.
१४ सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी कार्यालय व आस्थापना या कालावधीत ही 25% कर्मचारी क्षमतेसह सुरु राहतील.
हे बंदच राहणार
सार्वजनिक, खासगी क्रीडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने, बगिचे बंद राहतील.
केशकर्तनालय, सलून, स्पा, ब्युटी पार्लर, शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, शिकवणीवर्ग बंद राहणार आहेत. परंतु, ऑनलाइन शिक्षण सुरू राहील.
लग्न समारंभ, स्वागत समारंभ, मंगल कार्यालये, हॉल, चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, करमणूक व्यवसाय, नाट्यगृह, कलाकेंद्र, प्रेक्षकगृह, सभागृह बंद राहणार आहेत.
लग्न समारंभ करावयाचा असल्यास तो साध्या पद्धतीने घरगुती स्वरुपात करावा. लग्नामध्ये मिरवणूक, बॅन्ड पथक यांना परवानगी अनुज्ञेय राहणार नाही. लग्न समारंभाकरिता केवळ २५ व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी असेल. व लग्न सोहळा हा दोन तासापेक्षा जास्त चालणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल.
वृत्तपत्राचे वितरण पुर्ववत
सर्व वृत्तपत्रांची छपाई आणि वितरण सुरू राहील. वृत्तपत्रांची घरपोच सेवा करता येईल तसेच वृत्तपत्र वितरण संदर्भाने वाहतूक सुरू राहणार असल्याचेही आदेशात नुमद केले आहे.