शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

हजारो सभासदांना अंधारात ठेवून अकोला अर्बन बँकेची निवडणूक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 12:24 PM

बँकेच्या ९८८५८ सभासदांपैकी सत्तर टक्के सभासदांना, निवडणूक कार्यक्रमाबाबत माहितीदेखील नाही.

- संजय खांडेकर  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : हजारो सभासदांना अंधारात ठेवून दि. अकोला अर्बन को-आॅपरेटिव्ह बँकेच्या १७ संचालक पदांसाठी आगामी ५ जानेवारी २०२१ रोजी निवडणूक घेतली जात आहे. बँकेच्या ९८८५८ सभासदांपैकी सत्तर टक्के सभासदांना, निवडणूक कार्यक्रमाबाबत माहितीदेखील नाही. त्यामुळे अकोला अर्बन बँकेची आगामी निवडणूक वादात सापडण्याची शक्यता आहे.अकोला अर्बन बँकेची निवडणूक प्रक्रिया संशयास्पद पद्धतीने सुरू असून, बँकेची सभासद यादी तपासण्यात यावी, असा आक्षेप बँकेचे सभासद पुरुषोत्तम व्यास, अमर कटारिया यांनी केंद्रीय निबंधकांकडे आणि सोबतच अकोल्याचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशांकडे दाखल केला. बँकेच्या सभासद यादीत अनेक सभासद मयत आहेत. सोबतच खंडवा आणि इंदूर येथील सभासदांची यादी संशयास्पद असून, यादी अद्ययावत केलेली नाही. अशा आशयाची तक्रार व्यास यांची आहे. त्यावरील सुनावणी २१ डिसेंबर २०१९ रोजी ठेवलेली असताना बँकेने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक कार्यक्रमाची गोपनीयतादेखील बाळगली जात आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजय कदम यांची नियुक्ती १६ आॅगस्ट २०१९ रोजी झालेली असतानादेखील निवडणूक कार्यक्रम उशिराने जाहीर झाला आहे. सर्वसाधारण संचालक पदासाठी ९, शाखा प्रतिनिधींसाठी ४, मागासवर्गीयांसाठी १, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी १ आणि महिला प्रतिनिधींसाठी २ अशा एकूण १७ संचालक पदांसाठी ५ जानेवारी रोजी निवडणूक होऊ घातली आहे. १९ आणि २० डिसेंबर रोजी नामनिर्देश अर्ज दाखल करणे, २१ डिसेंबर रोजी छाननी, २३ ला अर्ज मागे घेणे, २६ ला अंतिम यादी आणि ५ जानेवारी रोजी निवडणूक असा कार्यक्रम आहे. अकोला जिल्ह्यासह कारंजा, मंगरूळपीर, नागपूर, जळगाव, अमरावती, यवतमाळ, दर्यापूर, मुंबई, चंद्रपूर, वर्धा, नांदेड, औरंगाबाद व नाशिक येथे मतदान केंद्र ठेवण्यात आले आहे. 

बँकेच्या सभासद यादीवर आक्षेप घेणारा अर्ज बँकेचे सभासद पुरुषोत्तम व्यास यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात सादर केला आहे. त्या सुनावणीत यादीसंदर्भात बाजू ठेवली जाणार आहे.-संजय कदम,निवडणूक निर्णय अधिकारी

बँकेच्या सर्व सभासदांना ११ डिसेंबर २०१९ रोजी पोस्टाद्वारे निवडणूक कार्यक्रमाची सूचना पाठविण्यात आली आहे. काहींना मिळाली नसेल. आम्ही यासंदर्भात एक वृत्तपत्रात निवडणूक कार्यक्रम प्रसारित केलेला आहे.- सुभाष शर्मा,उपमुख्य कार्यपालन अधिकारी

 

टॅग्स :Akolaअकोलाbankबँक